नगर जिल्हा
ग्रामसेवक संग्राम बोर्डे यांना “आदर्श ग्रामसेवक पुरस्कार”प्रदान
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संग्राम बोर्डे यांना जिल्हा स्तरीय “आदर्श ग्रामसेवक पुरस्कार” नुकताच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालीनी विखे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेने नुकताच आपल्या ग्रामविकास क्षेत्रात चांगले व लक्षवेधी काम करणाऱ्या ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरवले आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायतीचे उत्साही ग्रामसेवक संग्राम बोर्डे यांच्या कार्याची दाखल जिल्हा परिषदेने घेतल्याने भोजडे व परिसरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांचे हस्ते हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे.त्यावेळी कोपरगाव तालुका सहकारी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे.जिल्हा परिषद सदस्य विमल आगवन सरपंच उपसरपंच सदस्य व् मान्यवर या वेळी उपस्थित होते.पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचायत समिति सदस्य मधुकर टेके,सोनाली साबळे यांनी अभिनंदन केले आहे.गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,विस्तार अधिकारी सुनील माळी,डी. ओ. राणमळ,कृषि अधिकारी पंडित वाघेरे यांनी बोर्डे यांचा विशेष सत्कार केला आहे.भोजडे गावात शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमल बजावणी करण्यात आली.ग्रामसेवक संग्राम बोर्डे यांनी या ग्रामपंचायतीसाठी संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार,आय. एस. ओ. ग्रामपंचायत,स्मार्ट ग्राम पुरस्कार,वृक्ष लागवड,आदि उल्लेखनीय कामे केली आहे.शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचवुन ग्रामविकासाची दर्जेदार कामे करण्यात करण्यात ग्रामसेवक बोर्डे यांचे सहकार्य मिळाल्याने भोजडे ग्रामस्थानी त्यांचे अभिनंदन केले आहे.