कोपरगाव तालुका
कोपरगावात पालिकेत ‘त्या’घटनेच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ठाणे महापालिकेच्या माजीवडा प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पना पिंगळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आला असून या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे जखमी झाल्या असून त्याचे पडसात राज्यभर उमटले असून कोपरगावात नगरपरिषद कर्मचारी यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून “एक दिवस कामबंद आंदोलन” केले असल्याची माहिती उपमुख्याधिकारी व जिल्हा अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सुनील गोर्डे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर एका फेरीवाल्यानं हा हल्ला केला आहे.कल्पिता पिंगळे आज कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या.त्यावेळी एका फेरीवाल्यानं धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला.यात त्यांच्या हाताची तीन बोटे तुटली आहेत.तर डोक्यातदेखील गंभीर जखम झाली आहे.सध्या कल्पिता पिंगळे यांच्यावर ठाण्यातल्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.या घटनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.
राज्यातील ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पना पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद अधिकारी कर्मचारी एक दिवसीय काम बंद आंदोलन करत आहे.ठाणे महापालिकेच्या माजीवडा प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर नुकताच जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर एका फेरीवाल्यानं हा हल्ला केला आहे.कल्पिता पिंगळे आज कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या.त्यावेळी एका फेरीवाल्यानं धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला.यात त्यांच्या हाताची तीन बोटे तुटली आहेत.तर डोक्यातदेखील गंभीर जखम झाली आहे.सध्या कल्पिता पिंगळे यांच्यावर ठाण्यातल्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.या घटनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील अधिकारी व कर्मचारी संघटनेने तातडीने बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला असून त्या निषेधार्थ एक दिवस काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.