कोपरगाव तालुका
कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा पुन्हा पूर्वपदावर,साठवण तलाव भरले !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीपुरवठा करता यावा या उद्देशातून कोपरगाव नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना सहा दिवसाने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. याची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कोपरगाव शहरासाठी डाव्या कालव्याला पुरपाणी सोडण्यास सांगितले होते. त्यावर या विभागाने प्रतिसाद देऊन गोदावरी डाव्या कालव्याला कोपरगाव शहरासाठी पूरपाणी सोडले होते. त्या आवर्तनातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून आ. काळे यांनी दखल घेऊन नियोजन केल्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा पुन्हा पूर्वपदावर आला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मागील आठवड्यात कोपरगाव शहराच्या नागरिकांना कोपरगाव नगरपरिषदेने सहा दिवसांनी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन भोंग्याद्वारे घेतलेल्या निर्णयाची शहरातील नागरिकांना दिली होती त्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.त्यावर नूतन आ. आशुतोष काळे यांचीही शिघ्र प्रतिक्रिया अली होती व पाणी नियमित देण्याबाबत आश्वासीत करण्यात आले होते.त्यावर हि दुसरी प्रतिक्रिया आली आहे.
मागील आठवड्यात कोपरगाव शहराच्या नागरिकांना कोपरगाव नगरपरिषदेने सहा दिवसांनी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन भोंग्याद्वारे घेतलेल्या निर्णयाची शहरातील नागरिकांना दिली होती त्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.त्यावर नूतन आ. आशुतोष काळे यांचीही शिघ्र प्रतिक्रिया अली होती व पाणी नियमित देण्याबाबत आश्वासीत करण्यात आले होते. कायमच पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या कोपरगावच्या नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे निर्माण झाली होती.यावर आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागला गोदावरी डाव्या कालव्याचे पूरपाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनांचा आदर करून पाटबंधारे विभागाने डाव्या कालव्याला कोपरगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी पूरपाणी सोडल्यामुळे सर्व साठवण तलाव भरले आहेत. त्यामुळे कोपरगाव शहराच्या नागरिकांना सहा दिवसाने होणारा पाणीपुरवठा यापुढे पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार केला जाणार असल्याचे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले असल्याचा दावा आ. काळे यांच्या वतीने करण्यात आला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.