कोपरगाव तालुका
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रेरणादायी-..या नेत्याचा आशावाद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
दरम्यान कोपरगाव तहसिल कार्यालय येथे लोकशाहीर तुकाराम भाऊराव तथा अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सत साजरी करण्यात आली.तहसिलदार योगेश चंद्रे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.या प्रसंगी तुरुंग अधिकारी शंकर दुशिंग,कोतवाल साहेबराव रणशूर यांचेसह तहसिल कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते. साठे एका मांतंग समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते.त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे.अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो.आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे,शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न.गव्हाणकर यांनी केले.मुंबई,मराठवाडा,विदर्भ,कोकण,पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले होते त्यांचे कार्य आजही दीपस्तम्भाप्रमाणे प्रेरणादायी आहे.म्हणून त्यांच्या जयंती निमित्त कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात सफाई कर्मचारी मधुकर वाल्हेकर व सुधाकर थोरात यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावे वेळी ते बोलत होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा देणारे-तहसिलदार चंद्रे
दरम्यान कोपरगाव तहसिल कार्यालय येथे लोकशाहीर तुकाराम भाऊराव तथा अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सत साजरी करण्यात आली.तहसिलदार योगेश चंद्रे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.या प्रसंगी तुरुंग अधिकारी शंकर दुशिंग,कोतवाल साहेबराव रणशूर यांचेसह तहसिल कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.