कोपरगाव तालुका
कोपरगावात पैगंबर जयंती उत्साहात साजरी,शिबिरास प्रतिसाद
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहरात सालाबादप्रमाणे याही वर्षी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.या जयंती निमित्त श्रीमान गोकुलचंद माध्यमिक विद्यालयात सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित होते.इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादि नावांनीही संबोधित केले जाते.जगातील एका मोठ्या धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.
महंमद यांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणार्या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक एकेश्वरवाद मानू लागले.पण याहीपेक्षा महंमदांच्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दूरगामी परिणाम अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. महंमदांच्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण फ्रान्स व स्पेनपासून संपूर्ण उत्तर आफ्रिका व्यापत सुएझपर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात मंगोलियापर्यंत पसरले.आधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर महंमद पगंबर यांचा निःसंशय प्रभाव आहे.
त्यांची जयंती आजही मोठ्या उत्साहात जगात साजरी करण्यात येते.कोपरगावातही आज हि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.सरकार ग्रुप कोपरगाव यांनी या जयंती निमित्त आज सकाळी दहा वाजे पासुन कोपरगाव शहरातील श्री.गो .विद्यालय येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले होते रक्त दान शिबिर दंत तपासणी शिबिर डोळे तपासणी व चष्मा वाटप यात गरजुनी याचा लाभ घेतला आहे.व अनेक युवकांनी या शिबिरात रक्तदान केले सरकार ग्रुप चे संस्थापक नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी दर वर्षा प्रमाणे या ही वर्षी मिरवणूकीला फाटा देत सर्व युवकांना विश्वासात घेऊन असे समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले.हे उपक्रम राबवून यात सर्व जाती धर्माचे आर्थिक दुर्बल घटकांना याचा लाभ मिळतो हीच शिकवण मोहम्मद पैगंबर यांनी जगाला दिली आहे.
या कार्यक्रमाला कोपरगाव तालुक्याचे आ. आशुतोष काळे यांनी उपस्थिती लावली होती.त्यांनी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरकार ग्रुप चे मोसीन सय्यद आरबाज सय्यद, पप्पु सय्यद वसीम, शेख नाजीम, भुर्या सय्यद,आदील सय्यद, राजु सय्यद आदी पदाधिकारी सदस्य यांनी प्रयत्न केले.