कोपरगाव तालुका
कर्मवीर कारखान्याचा आगामी गळीत हंगाम यशस्वी करणार-आ. काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव ( प्रतिनिधी )
मागील दोन तीन वर्षापासून दुष्काळ व यावर्षी ओला दुष्काळ अशा दुहेरी संकटात सापडलेला २०१९-२० चा गळीत हंगाम अडचणीचा ठरणार आहे मात्र येणाऱ्या अडचणीवर मात करून गळीत हंगाम यशस्वी करु असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी कारखाना कार्यस्थळावर एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
मागील वर्षी सरासरीच्या पन्नास टक्के एवढा पाऊस झाला. गोदावरी नदीवरील केटीवेअर पूर्ण क्षमतेने भरले गेले नाही. गोदावरी कालव्यांनाही अपेक्षित रोटेशन मिळाले नाही. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात नवीन ऊस लागवडी झाल्या नाही. पशुधन वाचविण्यासाठी उपलब्ध असलेल्या ऊसाचा चाऱ्यासाठी वापर झाला. त्यामुळे यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्के साखरेच्या उत्पादनात घट होणार असून चालू वर्षीचा गळीत हंगाम हा साखर कारखानदारीस अडचणीचा असणार आहे. तरीही चालू गळीत हंगामात साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे-आ. आशुतोष काळे
कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन-2019-20 चा ६५ व्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, शीलाताई कुदळे या उभयतांचे हस्ते मोठ्या उत्साहात आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. अशोक काळे हे होते.
सदर प्रसंगी अनिल शिंदे, कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, छबुराव आव्हाड, बाळासाहेब कदम, सुधाकर आवारे, कारखान्याचे सर्व संचालक, संलग्न संस्थांचे सर्व अध्यक्ष,उपाध्यक्ष संचालक,पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, सेक्रेटरी सुनील कोल्हे,कार्यालयीन अधीक्षक बाबा सय्यद कार्मिक व्यवस्थापक दौलतराव चव्हाण,मुख्यभियंता निवृत्ती गांगुर्डे,मुख्य रसायन तज्ज्ञ सुर्यकांत ताकवणे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती, सर्व सदस्य, सर्व जिल्हा परिषद सदस्य,कोपरगाव नगर परिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक, राष्ट्रीय कॉंग्रेसचे पदाधिकारी व सर्व इतर पदाधिका–यांसह सभासद, शेतकरी व कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना आ.आशुतोष काळे पुढे बोलताना म्हणाले की, मागील वर्षी सरासरीच्या पन्नास टक्के एवढा पाऊस झाला. गोदावरी नदीवरील केटीवेअर पूर्ण क्षमतेने भरले गेले नाही. गोदावरी कालव्यांनाही अपेक्षित आवर्तने मिळाले नाही. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात नवीन ऊस लागवडी झाल्या नाही. पशुधन वाचविण्यासाठी उपलब्ध असलेल्या ऊसाचा चाऱ्यासाठी वापर झाला. त्यामुळे यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्के साखरेच्या उत्पादनात घट होणार असून चालू वर्षीचा गळीत हंगाम हा साखर कारखानदारीस अडचणीचा असणार आहे. तरीही चालू गळीत हंगामात साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी धरणातील पाणी साठा समाधानकारक असून जायकवाडी धरणावर अवलंबून असणारी खालची सर्व धरणे भरलेली आहेत. त्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामाचे आवर्तन पूर्ण क्षमतेने मिळणार आहे. विहिरींना देखील चांगल्या प्रमाणात पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवडी कराव्यात एकाच उसाच्या जातीवर अवलंबून न राहता जास्त साखर उतारा देणाऱ्या को- ८६०३२, को- १०,००१ या ऊसाच्या लागवडी कराव्यात सर्व गरजू शेतकऱ्यांना ऊस बेणे देणार व ज्यांना ऊस रोपापासून लागवड करावयाची आहे त्या शेतकऱ्यांना रोपे बुकिंग करून पुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले. परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावे अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. हे पंचनामे सुरु असतांना अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या त्यावेळी तहसीलदार व कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन एकही शेतकरी नुकसानभरपाई पासुन वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले.
विधानसभा निवडणुकीत टाकलेल्या जबाबदारीची मला जाणीव आहे. ज्याप्रमाणे आपल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची प्रतिकूल परिस्थितीतही प्रगती करून दाखविली. त्याप्रमाणे मतदार संघातील जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता कोपरगाव मतदार संघाचे विकासाचे अनुत्तरीत प्रश्न सोडवून सर्वांगीण विकास करून दाखवीन अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिव सुनील कोल्हे यांनी केले तर संचालक अरुण चंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.