नगर जिल्हा
दत्तात्रय खामकर यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
राहाता तालुक्यातील लोणी येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी व व्यापारी दत्तात्रय भागूजी खामकर ( वय-८७ )यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झालें आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर लोणी येथे स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
साधारण नऊ महिन्यांपूर्वी त्यांचे कनिष्ठ बंधू बाजीराव खामकर यांचे अकाली निधन झाले होते.व त्या आधी एक कनिष्ठ मुलगी त्यांनी गमावली होती त्या नंतर ते खचले होते.त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाही.त्यांना दोन दिवसांपूर्वी आधी हृदय विकाराचा सौम्य धक्का जाणवला होता त्या नंतर त्यांना लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते .उपचार सुरु असतानाच त्यांना पुन्हा दुसरा धक्का बसल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाने लोणी,राहाता,जवळके परिसरात शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.