जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पोरकट नेत्याचे पोरकट आदेश मानू नका, शहराच्या विकासाला हातभार लावा-नगराध्यक्ष

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आपण कोपरगावचे नगराध्यक्ष झाल्यापासून कोपरगाव शहरात विकासकामे राष्ट्रवादीच्या सहकार्याने सुरु असून काही विघ्नसंतोषी नेते त्यात अडथळे आणून आपल्या अकलेचे दिवाळे काढत असून “त्या” पोरकट नेत्याच्या पोरकट आदेशाने सातत्याने विकासकामात अडथळे आणीत असल्यामुळे विकासकामे सुरु होण्यात विलंब होत आहे. त्याचा त्रास शहरातील नागरिकांना होणार आहे याची जाणीव ठेवा.आपल्या पोरकट नेत्याचे पोरकट आदेश मानू नका,मोठ्या पणाने वागा आणि शहराच्या विकासाला हातभार लावा असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना केले आहे.

दरम्यान येवला रस्ता या ठिकाणी रस्त्याचे उदघाटन करताना विद्यमान नगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी,”आपल्या घराजवळच हे उदघाटन का घेतले ? तुम्हाला येवला नाका,अण्णाभाऊ साठे चौक दिसला नाही का ? व तुम्ही जाणीवपूर्वक हे ठिकाण निवडल्याचा आरोप केला आहे.व विशेष करून भरत मोरे यांना जबाबदार धरले आहे.

कोपरगाव येथे आज नगरपरिषद १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत ३ कोटी ५६ लाख २० हजार रुपये निधीतून प्रभाग क्र.३ मध्ये येवला नाका ते मार्केट यार्ड व मार्केट यार्ड ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, प्रभाग क्र.६ मध्ये एस.जी. विद्यालय ते हेम मेडिकल,अहिंसा स्तंभ ते आठरे घर रस्त्याच्या मजबुतीकरण खडीकरण,डांबरीकरण, रुंदीकरण कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी बांधकाम अभियंता दिगंबर वाघ,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे, जीज शेख,महेमूद सय्यद,प्रतिभा शिलेदार,वर्षा गंगूले,सपना मोरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल,भरत मोरे,दिनकर खरे,रमेश गवळी, विनायक सरोदे,कृष्णा आढाव, विनायक गायकवाड,राजेंद्र खैरे,पी.एम.पाटील,विनीत वाडेकर,योगेश वाणी,नंदू बागरेचा,चेतन खुबाणी,संजय कांबळे, वसंत जाधव,जवाहर शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव शहरातील विकासकामे करण्याच्या बाबतीत अनेकवेळा स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली, सर्वसाधारण सभेत चर्चा झाली व जिल्हाधिकाऱ्यांसमोर देखील दोनवेळा सुनावणी झाली.जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात विकासकामे करण्यास हिरवा कंदील दिला असतांना देखील कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नादाणपणा करून हि विकासकामे करू नये अशा आशयाचे पत्र कोपरगाव नगरपरिषदेला आणून दिले यावरून त्यांना शहरविकासाची किती तळमळ आहे याची कल्पना येते.खेळीमेळीच्या वातावरणात कोपरगाव शहराचा विकास होणे हि सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित आहे.सभागृहातील चर्चा,वादविवाद, ठराव व जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देवून देखील कोपरगाव शहराचा जाणीवपूर्वक विकास होवू द्यायचा नाही या उद्देशातून सर्व प्रकारचे निर्णय होऊनसुद्धा वारंवार विकासकामात अडथळे आणले जात आहे.कोपरगाव शहरातील सर्व मुख्य रस्ते झाले तर आ.आशुतोष काळे व नगराध्यक्षांना श्रेय मिळेल या भीतीपोटी श्रेयाच्या राजकारणातून किळसवाने प्रकार चालविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून यापुढे विकासकामात अडथळे आणू नका नाही तर येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही असा ईशारा वहाडणे यांनी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना यावेळी दिला आहे.

कोपरगाव शहराचा विकास व्हावा यासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी आणला आहे व यापुढे देखील शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.कोरोनाच्या संकटात देखील आमदार आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून शहरविकासासाठी निधी आणला आहे त्यामुळे सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी विकासकामात राजकारण न आणता जनतेचे हित लक्षात घेऊन विकासकामांना सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close