कृषी विभाग
कोपरगाव तालुक्यात कृषी संजीवनी शेतकरी मेळावा संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने २१ जून ते ०१ जुलै कालावधीत होत असलेल्या कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना व पीक व तंत्रज्ञान जनजागृती कार्यक्रम उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे बहादरपुर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सोयाबीन अठरा इंची तंत्रज्ञान सोयाबीन लागवडीचे बी.बी.एफ.तंत्रज्ञान सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड आदी उपक्रम कृषी विभागाच्या वतीने मोहीम स्वरूपात चालू असून यातून कृषी संजीवनी कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या विषयावर सोयाबीन,मका व बाजरी इतर पिकांचे तंत्रज्ञान माहिती दिली आहे.
महाराष्ट्र सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०२१ साठी ०४ हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. ही योजना राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांच्या लागवडीवर भर देईल आणि हवामान बदलांमुळे होणार्या अडचणींमध्ये शेतकर्यांना मदत करण्यासाठी राज्यभर राबविण्यात येत आहे.त्या अंतर्गत बहादरपूर येथे नुकताच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रसंगी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,कृषी पर्यवेक्षक डी.एल.भोसले,एस.पी.घनकुटे,कृषी सहाय्यक निलेश बिबवे,किशोर पिवळतकर,अनिरुद्ध घुगे,दिनकर कोल्हे,बहादरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास रहाणे,प्रगतशील शेतकरी रामदास कारभारी रहाणे,रामनाथ पाडेकर आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना सोयाबीन अठरा इंची तंत्रज्ञान सोयाबीन लागवडीचे बी.बी.एफ.तंत्रज्ञान सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड आदी उपक्रम कृषी विभागाच्या वतीने मोहीम स्वरूपात चालू असून यातून कृषी संजीवनी कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या विषयावर सोयाबीन,मका व बाजरी इतर पिकांचे तंत्रज्ञान माहिती दिली आहे.या उपक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे व शंभर टक्के बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराडे यांनी शेवटी केले आहे.
या वेळी सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान व इतर कृषी विभागाच्या योजना याबाबत शेतकरी बांधवांना सविस्तर माहिती देण्यात आली निलेश बिबवे व किशोर पिवळतकर यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले उपस्थित शेतकरी बांधवांना यानिमित्ताने बाजरी पीक लागवड तंत्रज्ञान व बाजरी पीक प्रात्यक्षिक देण्यासंबंधी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी आश्वासित केले तसेच कोरडवाहू विकास प्रकल्पातील मुरघास प्रकल्प व शेळी युनिटला सुधाकर बोराडे यांनी भेट दिली आहे.गावचे सरपंच कैलास रहाणे यांनी गावातील ग्रामस्थांचे व सर्व कृषी विभागाचे अधिकारी यांचे आभार मानले आहे.