जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव लोकप्रतिनिधींची स्मार्ट सिटीत बत्तीस एकरहून अधिक जमीन ? तालुक्यात खळबळ !

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघ्या काही तासांचा अवधी राहिला असताना रात्री आठच्या सुमारास सामाजिक संकेतस्थळावर सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींची कोपरगाव व वैजापूर तालुक्याच्या हद्दीत प्रस्तावित असलेल्या समृद्धी महामार्गाच्या स्मार्ट सिटीच्या जागी धोत्रे,लाखगंगा परिसरात सुमारे 31 एकर 45 आर जमीन घेऊन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून घेतला असून रात्रभर या विषयावर चौकाचौकात चर्वित-चर्वण सुरु होते.त्यामुळे सत्ताधारी गटाच्या प्रतिमेला जोरदार धक्का बसला असून विशेष म्हणजे ही स्थावर मालमत्ता निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद नसल्याने हा कज्जा कोर्ट कचेऱ्यांमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे.

कोपरगावात गतवर्षी चास येथील संचालकांच्या नावावर घेतलेल्या वाळू ठेक्यात जोरदार म्हणजे दोनशे कोटींची कमाई झाल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.या खेरीज उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे शंभर एकराची कमाई केली असून तेव्हढेच क्षेत्र “मौनगिरी”शिक्षण संस्थेच्या जवळ

मुंबई-नागपूर महामार्गालगत असल्याची या आधीच तालुक्यात चर्चा आहे.

सदरचे सविस्तर वृत्त से कि,राज्यातील विधानसभा सभेची आज 188 जागांसाठी निवडणूक संपन्न होत आहे.त्यासाठी सुमारे तीन लाख पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या परीने मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे.काही पक्षांनी आपल्या सत्ता आणि पैशाच्या जोरावर मतदार आपल्याकडे येत नाही हे पाहून त्यांना रोजंदारीवर आपल्याकडे खेचून घेतले.प्रचार फेऱ्यांनाही रोजंदारीसाठी या वेळी नजीकच्या तालुक्यातून मजूर ठेकेदारांनी मजूर पुरवून आपली संधी साधलीच पण मोठा रोजगारही उपलब्ध करून दिला.त्याला कोपरगाव तालुका सर्वात पुढे होता.दरम्यान या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडल्या आहेत.अकाली शिमगा साजरा करण्यात आला आहे.

सत्ताधारी पक्षाने एक निळवंडेची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची पोहेगाव येथील सांगता सभेची व्ही. डी. वो.क्लिप टाकली त्यात काळे यांनी कोपरगाव शहरास पाणी देण्याची घोषणा तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत केल्याची आठवण करून देऊन दुष्काळी भागातील मते सत्ताधारी काळे गटाकडून अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे खवळलेल्या राष्ट्रवादीने व त्याच्या प्रचार यंत्रणेने अखेरच्या क्षणी आपल्या भात्यातील राखीव बाण काढून त्याने सत्ताधारी गटाचे शरसंधान केंल्याचे मानले जात आहे

मात्र शेवटच्या दिवशी मात्र कहरच झाला असून कोपरगाव शहर व तालुक्यात रात्री साडेसात ते आठच्या सुमारास सामाजिक संकेत स्थळावर आधी संपूर्ण निवडणुकीत केंद्रस्थानी राहिलेल्या निळवंडेच्या मुद्यावर कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यावर सत्ताधारी पक्षाने एक निळवंडेची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची पोहेगाव येथील सांगता सभेची व्ही. डी. वो.क्लिप टाकली त्यात काळे यांनी कोपरगाव शहरास पाणी देण्याची घोषणा तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत केल्याची आठवण करून देऊन दुष्काळी भागातील मते सत्ताधारी काळे गटाकडून अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे खवळलेल्या राष्ट्रवादीने व त्याच्या प्रचार यंत्रणेने अखेरच्या क्षणी आपल्या भात्यातील राखीव बाण काढून त्याने सत्ताधारी गटाचे शरसंधान केंल्याचे मानले जात आहे.कारण सत्ताधारी गटाने आपले नामनिर्देशन सादर करताना या स्थावर मालमत्तेचा आपल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेखच केलेला नाही.त्यांनी ही बाब आधीच हेरून ठेवली होती व शेवट काय होणार याचा अंदाज घेतला असणार अशी चिन्हे आहेत.त्यांनी प्रसारित केलेल्या या जमीन मालकी हक्काच्या सात-बारा उताऱ्यात धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील ग.नं. 253/1 हा क्षेत्र 2.72 हेक्टर असून सत्ताधारी गटाच्या दूध डेअरीच्या एका महिला संचालकांच्या नावावर, “साधना”केलेली दिसत आहे.त्याच गट क्रं.253/2 हा असून त्यावर हीच “साधना” प्रकट झालेली दिसत आहे.तर तिसरे क्षेत्र हे वैजापूर तालुक्यातील लाखगंगा ग्रामपंचायत हद्दीतील असून त्याचा ग.नं.247 असा असून त्यावर सत्ताधाऱ्यांच्या, “विवेकाची” छाप दिसून येत आहे.तर त्याच गट क्रमांकामध्ये सत्ताधाऱ्यांच्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी खाली जमिनीवर पडलेल्या फुलांच्या, “पराग” कणांची उधळण झालेली दिसत आहेत.या एकाच गटाच्या संधानातून अनुक्रमे 2.68 व 4.46 हेक्टर क्षेत्राचा पराक्रम उघड झाला आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान कोपरगावात गतवर्षी चास येथील संचालकांच्या नावावर घेतलेल्या वाळू ठेक्यात जोरदार म्हणजे दोनशे कोटींची कमाई झाल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.या खेरीज उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे शंभर एकराची कमाई केली असून तेव्हढेच क्षेत्र “मौनगिरी”शिक्षण संस्थेच्या जवळ मुंबई-नागपूर महामार्गालगत असल्याची या आधीच तालुक्यात चर्चा आहे.खारघरने तर त्याच्या कलहात भलतीच भर घातली आहे.त्यामुळे नेत्यांनी असे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी नेमके कोणते बियाणे वापरली,कोणती खते, वापरली त्यावर कोणती पोषक द्रव्ये वापरली व एवढे विक्रमी उत्पादने काढून नगर जिल्ह्यात कोटींचो उड्डाणे केली हे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर येणे गरजेचे झाले असून माध्यमांना असे “आयडॉल” प्रेरणास्थाने तालुक्यात असतांना त्यांचा शोध अद्याप लागलेला नव्हता आता ही “प्रेरणास्थाने” भविष्यात मोठ्या जोमाने पुढे येथील व बिगर पाण्याची शेती तालुक्यात पुन्हा एकदा बहरून येईल व कोपरगावचा पुन्हा एकदा “कॅलिफोर्निया”आकारास येईल हे नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close