जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी संपत्तीचे केले ओंगळवाणे प्रदर्शन-विजय वहाडणे यांची टीका

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी

कोपरगाव विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष व विरोधात असलेले सहकार सम्राट यांनी संपत्तीचे खूपच अभद्र प्रदर्शन केले असल्याची टीका कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष व अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांनी नुकतीच वाकडी येथील सभेत बोलताना केली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात शेजारच्या तालुक्यातून आपल्या प्रचारासाठी व सभांसाठी रोजंदारीने मजूर आणण्याचे काम सुरु आहे.तालुक्यातील मतदारांना निवडणुकीच्या काळातील मजूरीही त्या निमित्ताने बुडाली असल्याचा गौप्य स्फोटही त्यांनी या वेळी केला आहे.मंदिर,मस्जिदी,चर्च विविध संघटना आदींना बक्षिसे देण्याची लयलूट वाढली आहे.हा सर्व पैसा यांच्याकडे नेमका कुठून आला.यांच्या तरुण पिढीने आलिशान मोटारी वापरण्यासाठी कुठून मलिदा आणला.याचा खुलासा यांनी करणे गरजेचे आहे-वहाडणे

कोपरगाव विधानसभा मतदारसंघांची निवडणूक 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.त्यासाठी प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्यात आली असून अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांची प्रचार सभा राहाता तालुक्यातील वाकडी, पुणतांबा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी युवा शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव रुपेंद्र काले, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष वाल्मिकराव भोकरे,नामदेव जाधव,नरेंद्र मोदी मंचचे तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे गणपतराव दवंडे , किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब गाढवे,आप्पासाहेब कोल्हे,वेसचे प्रथम सरपंच माणिक दिघे,किरण थोरात,नवनाथ जाधव,प्रताप वहाडणे,मधुकर वहाडणे,सिताराम वहाडणे,निलेश साळुंके,माधवराव सांगळे,राधुजी वहाडणे,बाबूराव आहेर,सोपान आव्हाड,दशरथ पालवे,संजय कानडे,शिवा थोरात आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

कोपरगाव तालुक्यातील सहकारी दरोडेखोरांना वठणीवर आणून मतदारसंघ विकसित करायचा असेल,सिंचनासाठी पिण्यासाठी पाणी,बेरोजगारांसाठी औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी व शासकीय कार्यालयात होणारी जनतेची फरफट थांबविण्यासाठी,शहर विकासातील अडथळे दूर करण्यासाठी परिवर्तन केले पाहिजे असे आवाहन केले.सर्वसामान्य मतदार सुप्तपणे प्रस्थापितांना धडा शिकविणारच-विजय वहाडणे.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि,विधानसभा निवडणुक प्रचार शेवटच्या टप्प्यात असतांना कोपरगाव मतदारसंघातील सहकार सम्राटांनी आचारसंहिता धाब्यावर बसवून संपत्तीचे किळसवाणे प्रदर्शन करत आहेत. शेजारच्या तालुक्यातून आपल्या प्रचारासाठी व सभांसाठी रोजंदारीने मजूर आणण्याचे काम सुरु आहे.तालुक्यातील मतदारांना निवडणुकीच्या काळातील मजूरीही त्या निमित्ताने बुडाली असल्याचा गौप्य स्फोटही त्यांनी या वेळी केला आहे.मंदिर,मस्जिदी,चर्च विविध संघटना आदींना बक्षिसे देण्याची लयलूट वाढली आहे.हा सर्व पैसा यांच्याकडे नेमका कुठून आला.यांच्या तरुण पिढीने आलिशान मोटारी वापरण्यासाठी कुठून मलिदा आणला.याचा खुलासा यांनी करणे गरजेचे आहे.आता या शेतकऱ्यांच्या लुटी करणाऱ्यांना आपण बाजूला सारले नाही तर पुढील काळात मतदारांना पच्छाताप करावा लागेल.याना सहकारी कारखाने ,दारू कारखाने लुटीसाठी कमी पडल्याने यांनी आता वाळूचे अवैध व्यवसाय सुरु केले असून ठेकेदारी,दलाली आदी नवीन व्यवसाय सुरू केले आहे.मात्र याला मतदार बाळी पडणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त करून आमचे कार्यकर्ते गावे,वाड्या, वस्त्यांवर फिरून मतदारांशी संपर्क करत आहेत. त्याना प्रचारात जनतेने न भूतो असा प्रतिसाद दिला आहे.व सहकारातील दरोडेखोरांना वठणीवर आणून मतदारसंघ विकसित करायचा असेल,सिंचनासाठी पिण्यासाठी पाणी,बेरोजगारांसाठी औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी व शासकीय कार्यालयात होणारी जनतेची फरफट थांबविण्यासाठी,शहर विकासातील अडथळे दूर करण्यासाठी परिवर्तन केले पाहिजे असे आवाहन केले.सर्वसामान्य मतदार सुप्तपणे प्रस्थापितांना धडा शिकविणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.वाकडी,पुणतांबा, धामोरी, टाकळी, रवंदे इ.ठिकाणी जाहीर सभा पार पडल्या.शिट्टीचा आवाज मतदारसंघात घुमणारच असा विश्वास उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close