जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यापार विषयक

…या गावात खा.वाकचौरे यांनी केले हॉटेलचे उद्घाटन !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)
  
कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळ या ठिकाणी कोपरगाव बाजार समितीचे माजी संचालक भीमराज गुंजाळ व त्यांचे सुपुत्र अर्जुन गुंजाळ यांनी काकडी (शिर्डी) विमानतळ प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आपल्या जागेत नुकतेच भव्य ‘हॉटेल साई संजीवनी’ उभारून त्याचा शुभारंभ शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे.त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काकडी विमानतळ येथे ‘हॉटेल साई संजीवनी’ चे उद्घाटन करताना खा.भाऊसाहेब वाकचौरे दिसत आहेत.

“हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात तसंच परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतायत.त्यामुळे या क्षेत्राकडे वळणाऱ्याची संख्या वाढतेय.याला आता शिर्डी पाठोपाठ आता काकडी विमानतळ अपवाद राहिले नाही.या ठिकाणी काकडी विमानतळ हा आकर्षक पर्याय ठरला असून यात आता कोपरगाव बाजार समितीचे माजी संचालक भीमराव गुंजाळ आणि त्यांचे सुपुत्र अर्जुन गुंजाळ यांनी पदार्पण केले आहे ही कौतुकाची बाब आहे”-खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा.

स्वयंपाक ही एक कला आहेच पण तो आकर्षक व्यवसायही झाला आहे.शेफ बनणं आता प्रतिष्ठेचं मानलं जातं.हे क्षेत्र वेगाने विस्तारत असून,प्रोफेशनल शेफना बरीच मागणी आहे.स्वयंपाकाची आवड असणाऱ्या व्यक्तीला शेफ म्हणून नवनव्या डिशेस बनवण्याची संधी तर मिळतेच.शिवाय त्यातून स्वतःचं करिअरही घडवता येतं.
निरनिराळी हॉटेल्स,त्यातून मिळणाऱ्या चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव मारणं हे आजच्या लाइफस्टाइलचा एक भाग बनला आहे.काही हॉटेल्सचे विशिष्ट पदार्थ चाखायला लोक आवर्जून त्या हॉटेलची पायरी चढत असतात.शिवाय फूडचे वेगवेगळे इव्हेंटस टीव्हीवर दिसत असतात.त्यातून वेगवेगळ्या रेसिपीज लोकांसाठी पेश केल्या जातात.एकूणच स्वयंपाक बनवणं ही कला घरापुरती मर्यादित राहिली नाही.कुणालाही खूश करण्याचा मार्ग पोटातून जातो हे व्यावसायिकांना पक्कं उमगलं आहे.त्यामुळे चमचमीत खाना खजाना बनवणाऱ्यांना खूप महत्त्व आलं आहे.

या व्यवसायाला एक प्रकारचं ग्लॅमरचं स्वरुपही प्राप्त झालं आहे.हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात तसंच परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतायत.त्यामुळे या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय.याला आता शिर्डी पाठोपाठ आता काकडी विमानतळ अपवाद राहिले नाही.या ठिकाणी काकडी तथा शिर्डी विमानतळ हा आकर्षक पर्याय ठरला असून यात आता कोपरगाव बाजार समितीचे माजी संचालक व ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव गुंजाळ आणि त्यांचे सुपुत्र अर्जुन गुंजाळ यांनी पदार्पण केले आहे.त्यांनी नुकतेच या नावीन्य पूर्ण क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांनी आता आपला शेती हा पारंपरिक व्यवसाय सोडून आपली वेगळी वाट चोखाळली आहे.त्यांनी याआधी काकडी विमानतळाचा विकासासाठी काकडी विमानतळ विकास समितीत पत्रकार नानासाहेब जवरे,संजय गुंजाळ यांचेसोबत महत्वपूर्ण योगदान दिले आहे.त्यामुळे या गावाचा अभूतपूर्व विकास झाला आहे.संपूर्ण चित्र बदलून गेले आहे.त्यांनी छोट्या व्यवसायातून आता मोठी झेप घेत मोठी रक्कम गुंतवून आपल्या दोन मजली इमारत पूर्ण करून शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे हस्ते नुकतेच या ‘हॉटेल साई संजीवनी’ या हॉटेलचे उद्घाटन केले आहे.त्यावेळी ह.भ.प.सुदाम महाराज कातकडे यांचे कीर्तन आयोजित केले होते.त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

  सदर प्रसंगी संगमनेर येथील आ.अमोल खताळ,गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ऍड.नारायणराव कार्ले,आश्र्वी येथील सुनील महाराज  पवार,हरियाणा कर्नल येथील रामदासजी महाराज,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,शिवसेनेचे गिरगाव येथील विभाग प्रमख शिवाजी रहाणे,शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,जिल्हा ग्राहक मंच चे जिल्हाध्यक्ष मुकुंद शिनगर,अविनाश दंडवते,विजय दंडवते,अरुण येवले,नानासाहेब गव्हाणे,भाजप तालुकाध्यक्ष कैलास रहाणे,माजी सरपंच विलास डांगे,बाबासाहेब गुंजाळ,प्रभाकर गुंजाळ,कानिफनाथ गुंजाळ आदीसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते.

   सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक भीमराज गुंजाळ यांनी केले आहे तर सूत्रसंचालन अर्जुन गुंजाळ यांनी केले आहे तर पत्रकार नानासाहेब जवरे यांनी काकडी गावांसाठी क्रांतिकारी ठरलेल्या काकडी विमानतळासाठी भीमराज गुंजाळ आणि त्यांच्या कुटुंबाचे असलेले योगदान विदित केले आहे.अनेकांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत तर उपस्थितांचे आभार कालवा कृती समितीचे उपाध्यक्ष संजय गुंजाळ यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close