जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पत्नी आणि मुलांकडून पित्याचा निर्घृण खून,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव शिवारातील रहिवासी असलेले इसम बाबुराव छबुराव निकम (वय-५१) या इसमाचा काल रात्री ०९ वाजेच्या सुमारास मयताची पहिली व फिर्यादीची सवत झुंबरबाई निकम व तिचा मुलगा सोनू उर्फ प्रफुल्ल बाबुराव निकम व सवत झुंबरबाई हीचा पिता सोपान लक्ष्मण कोपरे या तिघांनी काही तरी टणक वस्तूचा प्रहार करून त्यांचा खून केला असल्याचा गुन्हा मयत इसमांची दुसरी पत्नी लताबाई बाबुराव निकम (वय-४०) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुरेगावात घटनास्थळी पंचनामा करताना कोपरगाव तालुका पोलीस अधिकारी दौलतराव जाधव व अन्य पोलीस कर्मचारी दिसत आहेत.

मयत हा व्यसनाधीन होता.व वारंवार पहिल्या पत्नीस व मुलास व सासऱ्यास मारहाण करत होता.रात्रीही या घटनेची पुनुरावृत्ती झाली होती.त्याबाबत मयताच्या पहिल्या पत्नीने आपला जीव वाचविण्यासाठी याबाबत गावातील संबंधित पोलिसांशी संबंधित एका अधिकाऱ्यास याबाबत काही तरी कारवाई करावी अशी गळ घातली होती.त्यांनी त्या दोघांची समजुत घालून रवाना केले होते.अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे.त्याला संबंधित अधिकाऱ्याकडून दुजोरा मिळाला आहे.त्या नंतर हि घटना रात्री झाली आहे.

कोपरंगाव तालुक्यातील सुरेगावात घटनास्थळी नागरिकांनी सकाळी केलेली गर्दी छायाचित्रात दिसत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला लताबाई निकम हि मयत इसमांची दुसरी पत्नी आहे.मयत बाबुराव निकम यांचा पहिला विवाह हा झुंबरबाई हिच्याशी झालेला होता.तिच्या पासून त्या इसमास दोन मुले आहे.मात्र लग्नानंतर पहिले नव्या नवलाईचे काही वर्ष वगळता पहिली पत्नी व मयताचे यांचे नंतर खटके उडू लागले होते.याला कारण वेस येथील आदिवासी महिलेचे व मयताचे प्रेम प्रकरण रंगात आले होते.त्यामुळे या वादाचे रूपांतरण वारंवार भांडणे व हाणामाऱ्या यात होऊ लागले होते.याला कंटाळून पहिली पत्नी आपल्या एका मुलाला घेऊन हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या सुरेगावात असलेल्या माहेरी निघून गेलेली होती.मात्र मधून-मधून त्यांची भांडणे वारंवार होत होते.तर एक मतिमंद सदृश एक मोठा मुलगा मयत याचे जवळच राहत होता.दरम्यान काल रात्री काही अज्ञात कारणाने त्याचे भांडण झाले होते.मयत हा व्यसनाधीन होता.व वारंवार पहिल्या पत्नीस व मुलास व सासऱ्यास मारहाण करत होता.रात्रीही या घटनेची पुनुरावृत्ती झाली होती.त्याबाबत मयताच्या पहिल्या पत्नीने आपला जीव वाचविण्यासाठी याबाबत गावातील संबंधित पोलिसांशी संबंधित एका अधिकाऱ्यास याबाबत काही तरी कारवाई करावी अशी गळ घातली होती.त्यांनी त्या दोघांची संमजुत घालून रवाना केले होते.अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे.त्याला संबंधित अधिकाऱ्याकडून दुजोरा मिळाला आहे.मात्र त्याचे भांडण मिटले नाही घरी जाऊन पुन्हा या भांडणाचा मोठा विपर्यास झाला होता.परिणाम स्वरूप या भांडणाचा विपर्यास होऊन मयत इसमाच्या पहिल्या पत्नीचा,मुलाचा व मयताच्या पहिल्या पत्नीच्या वडील सोपान कोपरे यांचा राग अनावर झाला असावा त्यातून त्यांनी हाती आलेली काहीतरी टणक वस्तूने मयत बाबुराव निकम याचे डोक्यात जोरदार प्रहार केला असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यातून त्याचा खून झाला असावा असा कयास गावातील नागरिक व्यक्त करीत आहे.घटनेनंतर त्यांनी मयतास आपल्या दुचाकीला बांधून ओढत नेल्याची खबर असून कोळगाव थडी रस्त्याच्या कडेला संजय दामोदर निकम यांचे उसाचे शेतशेजारी नालीत फेकून दिले असल्याची नागरिकांची चर्चा सुरु आहे.आज सकाळी हि घटना दहा वाजता उघड झाली आहे.त्यामुळे सुरेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी फिर्यादी व मयताची दुसरी पत्नी लताबाई निकम हिच्या फिर्यादीवरून गु.र.क्रं.२०७/२०२१ भा.द.वि.कलम ३०२,३२३,३४ प्रमाणे पहिली पत्नी व आरोपी झुंबरबाई निकम व तिचा लहान अल्पवयीन मुलगा सोनू उर्फ प्रफुल्ल निकम,झुंबरबाई हीचा पिता सोपान कोपरे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्या तिघांना अटक केली आहे.पुढील तपास शिर्डी येथील उपविभागागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close