सण-उत्सव
लोहगावात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सरकारच्या एका मोठ्या निर्णयाची माहिती दिली होती व रविवारी साजरा होणारा शिवराज्याभिषेक दिन राज्यभरातील सर्व महाविद्यालयांमद्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सांगितले होते.तर पुढील वर्षीपासून शिवज्योत रॅली काढली जाणार असल्याची घोषणा केली होती.हा उत्सव लोहगावसह अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सरकारच्या एका मोठ्या निर्णयाची माहिती दिली होती व रविवारी साजरा होणारा शिवराज्याभिषेक दिन राज्यभरातील सर्व महाविद्यालयांमद्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सांगितले होते.तर पुढील वर्षीपासून शिवज्योत रॅली काढली जाणार असल्याची घोषणा केली होती.हा उत्सव अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.या आदेशाचे पालन स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यास सांगितले होते.त्यानुसार राज्यभर हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून त्याला लोहगाव ग्रामपंचायत अपवाद नव्हती.त्यानीही या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.
राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत येथे सुवर्ण कलश गुडी व शिवराज्याभिषेक दिनाचे उदघाटन सरपंच सरपंच स्मिता भाऊसाहेब चेचरे यांच्या हसते अकरण्यात आले आहे.
सदर प्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेश चेचरे,ग्रामविकास अधिकारी श्रीमती. रुक्मिणी सुर्यवंशी,अॅड.बाबासाहेब चेचरे,लहानु चेचरे,सतीश गिरमे,शांताराम चेचरे,भाऊसाहेब चेचरे,विलास गोपाळे,रावसाहेब चेचरे,दयाबाई यशवंत बोर्डे मॅडम, मुख्याध्यापिका डिंबर मॅडम,चेचरे मॅडम,झरेकर मॅडम,श्री कदम सर, आंत्रे सर,श्री.मेहेर सर,कृषी विभागाचे किशोर कडू,ग्रामपंचायत कर्मचारी स्वाती हारदे,अशोक वांगे,कादरखान शेख,राहुल पारखे व ग्रामस्थ उपस्थित होते.