आरोग्य
कोपरगावात आ.काळेंच्या कामाची वरिष्ठांकडून दखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या वैश्विक महामारीत मागील वर्षापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे कोरोना संसर्गापासून संरक्षण व्हावे यासाठी आ. आशुतोष काळे यांनी राबविलेल्या उपाययोजना व त्या उपाययोजनांमुळे मतदार संघात कमी झालेली बाधित रुग्णांची संख्या याची राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या बरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी देखील दखल घेऊन केलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले आहे अशी माहिती कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांची आ.काळे यांनी भेट घेतली त्यावेळी देखील त्यांनी आ. काळे यांच्या कामाचे कौतूक करून जनतेची काळजी घेत असतांना स्वत:च्या तब्बेतीची देखील काळजी घेण्यास सांगितले होते व नुकतेच प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी देखील पत्र पाठवून आ. काळे यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते खा. पवार यांच्या निर्देशानुसार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणानुसार २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण अशा विचारधारेवर पक्षाची वाटचाल सुरु आहे. हि विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आ.काळे यांनी कोरोना काळात समाजासाठी दिलेल्या योगदानातून पक्षाची समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होत आहे. त्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेशी जोडला जात आहे याचा पक्षाला विशेष अभिमान वाटत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्याप्रमाणावर संसर्ग वाढल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या तर वाढलीच परंतु त्याचबरोबर गंभीर रुग्ण देखील वाढले होते. त्यामुळे साहजिकच ऑक्सिजन खाटांची उणीव भासत होती. गरजू रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हते अशा परिस्थितीत ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर व १०० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु करून बाधित रुग्णांची सोडविलेली अडचण दिलासा देणारी ठरली. त्याचबरोबर गोरगरीब,हातावर पोट असणारे नागरिक व परप्रांतीय मजूर या सर्वांनाच केलेल्या मदतीतून पक्षाची प्रतिमा अधिक उजळ करण्याचे काम केले असल्याचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी आ. काळे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.