निधन वार्ता
संजीवनीचे माजी संचालक देवकर यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील प्रगतशील शेतकरी व टाकळी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब उर्फ पथाजी भागाजी देवकर (वय-६७) यांचेनुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा,तीन मुली नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.पथाजी देवकर हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे सन-१९९९ ते २०१४ या चौदा वर्ष संचालक होते.त्यांनी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे ते विश्वासू विश्वस्त होते.त्त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला आहे.