कोपरगाव तालुका
कोपरगाव मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना पैठण्या वाटण्यास प्रारंभ !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-( प्रतिनिधी )
कोपरगाव विधानसभेच्या निवडणुकीत आपले नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या आधीच मतदारांची मते आपल्या पारड्यात येण्यासाठी या मतदारसंघात गणेशोत्सव मंडळांचे उत्तेजनार्थ बक्षिस वाटपाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यानी आपले रंग दाखविण्यास प्रारंभ केला असून ग्रामीण भागासह कोपरगाव शहरात महिला मतदारांना,कष्टकऱ्यांना पैठण्या वाटण्यास प्रारंभ केल्याने तालुक्यातील अन्य पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे.
2004 च्या निवडणुकीत तर या मतदारसंघात मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी गावोगावच्या बसस्थानकावर व भरचौकात अडबाजूला बसून केवळ शंभर रुपयांच्या मुद्रांकावर दहा ते पंधरा हजारांचे कर्ज वाटून मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्याची स्पर्धा लागली होती. या वेळी पुन्हा तालुक्यातील प्रस्थापितांनी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी चंग बांधला असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून या वेळी तर कहरच झाला असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आत साड्या, लुगडे,पैठण्या वाटण्यास प्रारंभ केला असल्याचे जागोजागी निदर्शनात येत आहे.याला ग्रामीण भागातील पुणतांबा गटही अपवाद नाही.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघ साखर व दारू सम्राटांच्या प्रभावक्षेत्रात येत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील या मतदार संघातील निवडणूक दर पंचवार्षिकला गाजत असते.त्याला हि निवडणूक अपवाद असण्याचे काम नाही.या वर्षी नुकताच गणेशोत्सव संपन्न झाला हे तर शारदीय नावरात्रोसत्व आता अंतिम टप्य्यात असताना हि संधी शोधली तर कमालच म्हणायची ! प्रत्येक निवडणुकीत हि मतलोभी मंडळी आपले प्रताप दाखवत असते.मग हे आघाडी शासनात असो नाही तर युती शासनात यांना कुठलाही विधी निषेध नसतो.2004 च्या निवडणुकीत तर या मतदारसंघात मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी गावोगावच्या बसस्थानकावर व भरचौकात अडबाजूला बसून केवळ शंभर रुपयांच्या मुद्रांकावर दहा ते पंधरा हजारांचे कर्ज वाटून मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्याची स्पर्धा लागली होती. या वेळी पुन्हा तालुक्यातील प्रस्थापितांनी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी चंग बांधला असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून या वेळी तर कहरच झाला असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आत साड्या, लुगडे,पैठण्या वाटण्यास प्रारंभ केला असल्याचे जागोजागी निदर्शनात येत आहे.याला ग्रामीण भागातील पुणतांबा गटही अपवाद नाही.व कोपरगाव शहरही.त्यामुळे या बाबत तर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी तर सामाजिक संकेतस्थळावर जाहीर वाच्यता केली असून त्याची शहर व तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.निवडणूक अधिकाऱ्यांनी व फिरत्या पथकांनी या मतावर दरोडा टाकणाऱ्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान सत्ताधारी गटाचे काही कार्यकर्ते तर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना चिडीचूप केल्याचे खाजगीत बोलत असल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
त्यांचा सत्ताधारी लोकप्रतिनिधीवर रोख असल्याचे निदर्शनात येत आहे.व प्रस्थापितांनी पाच वर्षात कुठलेही काम केले नसल्याने त्याना पराभवाची भीती आताच सतावू लागली असल्याने आर्थिक दुर्बल,घटकातील शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी आदींना लोभ दाखवून दिवस धावल्या लोकशाहीचा खून चालवला आहे.त्यांचा निवडणूक आयोगाने बंदोबस्त करावा व फिरती पथके अधिक सतर्क करावी अशी मागणी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.