आरोग्य
सावळीविहिर परिसरात साथीच्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ,आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
सावळीविहिर (प्रतिनिधी )
सध्या राहाता तालुक्यातील सावळीविहीर व परिसरात डेंगू व इतर साथीच्या आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून येथील दवाखाने सध्या रुग्णांनी खचाखच भरलेले दिसून येत आहे त्यामुळे सावळीविहीर गावात व परिसरात व वाड्या-वस्त्यांवर त्वरित डास प्रतिबंधक फवारणी करण्याची मागणी सावळीविहीरकरांनी केली आहे.
सावळीविहिर व परिसरात सध्या पावसामुळे ठीक ठिकाणी पाण्याचे डबके तसेच मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे जागोजागी दिसून येत आहे त्यामुळे डासांची उत्पत्तीस्थाने येथे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे येथे विविध रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे डेंगू सारखे आजाराने सावळविहिर व परिसरात थैमान घातले आहे अनेक डेंग्यूचे रुग्ण विविध दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत त्याचप्रमाणे गोचीड ताप मलेरिया सर्दी खोकला अशा विविध आजाराचे रुग्ण येथे दवाखान्यात उपचार घेताना दिसत आहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व खाजगी दवाखाने रुग्णांनी खचाखच भरल्याचे दिसून येत आहे. खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे औषधी दुकांनामधून औषधे गोळ्या घेताना बिले न देता अधिक रक्कम घेऊन औषधी दिली जातात यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी मुकुंद वाघमारे यांच्या पत्नी राणी वाघमारे यांचे सुद्धा आठ दिवसापूर्वी डेंगू आजाराने निधन झाले त्यामुळे सावळीविहीर येथे डास प्रतिबंधक फवारणी त्वरित करावी तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर झटपट उपचार करण्यात यावे यासाठी संबंधितांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे