खेळजगत
दिल्ली येथे होणा-या हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक करणार महाराष्ट्राचे नेतृत्व
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
पुणे येथील राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचलनालयंतर्गत अंतर्गत जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू सब-जुनियर हॉकी स्पर्धा दि.२ ते ३ ऑक्टोबर रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर पार पडली.
सदर स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या सब-जुनियर संघाने पुणे विभागाचे नेतृत्व केले. अंतिम सामन्याचे नाणेफेक संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात गौतम पब्लिक स्कूलने नाशिक विभागावर ७-२ अशा गोल फरकाने सहज मात केली. तर उपांत्य सामन्यात औरंगाबाद विभागावर ८-० असा एकतर्फी विजय मिळवला आहे. स्पर्धेच्या चुरशीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात गौतमच्या संघाने मुंबई विभागावर २-१ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयाने गौतमचा संघ दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.
गौतमच्या संघाकडून रितेश पोल (औरंगाबाद), श्रीयोग भालेराव( नाशिक), हर्ष काकडे (नाशिक), संग्राम कहाटे (औरंगाबाद), योगेश खेडकर (औरंगाबाद), सार्थक पटारे (अहमदनगर), ओम भाबड (नाशिक), प्रमोद दराडे (औरंगाबाद), सुशांत बेडसे (धुळे) कार्तिक पटारे (अहमदनगर) वैभव देसले (धुळे, समर्थ गोंदकर (अहमदनगर) विवेक च-हाटे (जलगाव), सागर खडसे (जळगाव), जनार्दन सापते (नाशिक), तेजस सोनवणे (नाशिक) या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
गौतमच्या या सर्व खेळाडूना शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर नीलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, कपिल वाघ, संजय इटकर आदींचे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले.
माजी आ.अशोक काळे, विश्वस्त, आशुतोष काळे, सचिव चैताली काळे, सहसचिव स्नेहलताई शिंदे, सर्व संस्था सदस्य, शाळेचे प्राचार्य नूर शेख आदींनी गौतमच्या विजयी संघाचे अभिनंदन केले आहे.