आरोग्य
कोपरगावात रुग्ण वाढ मंदावली,मृत्यू दर टिकून
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १० हजार ८८२ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १ हजार १२१ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १६५ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ४५ हजार ६७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०१ लाख ८२ हजार ७१२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २३.८२ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ०९ हजार ५९६ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ८८.१८ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख १४ हजार ९५७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २८ हजार ८६२ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ८३ हजार ७०४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ३९० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.