कोपरगाव तालुका
निवडणूक खर्च निरीक्षक जतीन यांनी घेतला कोपरगाव मतदार संघाचा आढावा
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव (प्रतिनिधी )राज्यातील 288 जागांसाठी विधानसभा निवडणूक येत्या एकवीस ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरिक्षक के.ए.जतीन यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीचा नुकताच आढावा घेतला असून समाधान व्यक्त केले आहे.महाराष्ट्रासह हरियाणाच्या विधानसभेची निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.21 ऑक्टोबर रोजी राज्यात 288 जागांसाठी निवडणूक संपन्न होत आहे.या साठी सर्वच पक्ष व कार्यकर्ते कामाला लागले असून निवडणूक आयोगही पूर्व तयारीला लागला आहे.27 सप्टेंबर पासून नाम निर्देशन पत्र घेण्यास सुरुवात झाली असून अद्याप नामनिर्देशन पत्र घेऊन जाण्यास प्रारंभ झाला आहे.काल पहिल्या दिवशी 19 अर्ज इच्छुक उमेदवारांनी नेले आहे.या पार्श्वभूमीवर काल भारतीय निवडणूक आयोगाचे खर्च निरीक्षक के.ए. जतीन यांनी कोपरगाव येथे अचानक भेट देऊन विधानसभा निवडणुकीच्या पुरवा तयारीची पाहणी केली आहे.
निवडणूक निरिक्षक के.ए.जतीन यांनी शिर्डी येथे शासकीय विश्रामगृह येथे सकाळी कोपरगांव,श्रीरामपूर आणि नेवासा येथील विधानसभा निवडणूक निरिक्षक आणि सहाय्यक यांची बैठक घेवून तीनही मतदार संघाचा आढावा घेतला आहे.
आज ते कोपरगांव येथे आढावा घेण्यासाठी आले होते.त्यांनी कोपरगांव विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला.तसेच निवडणूक निर्णय अधिकारी दालन येथे निवडणूक शाखेमार्फत पूर्वतयारीची पडताळणी केली.तसेच मतदारांच्या प्रबोधन आणि जनजागृतीसाठी आकर्षक सजविलेले मिडिया सेंटर,उमेदवारांना आणि मतदारांना सहज समजेल अशा निवडणूक प्रक्रियेची सुलभ माहिती फलक, खर्च नियंत्रण कक्ष,मतदार सहाय्यता कक्ष अशा निवडणूक प्रक्रियेशी निगडित सर्व दालनांना भेट दिली. विधानसभा निवडणुकीची सर्व तयारी पाहून निवडणूक निरिक्षक के.ए.जतीन यांनी समाधान व्यक्त केले. त्यांचे समवेत नोडल अधिकारी सी.व्ही.अंकुश उपस्थित होते.या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांचे सह निवडणूक प्रक्रियेशी निगडित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.