कोपरगाव तालुका
कोपरगावात पहिल्या दिवशी एकोणाविस अर्जाची विक्री,वहाडणे,लबडे यांचा समावेश
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
विधानसभा निवडणुकीचे रणकंदन सुरु झाले असून 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन भरण्याच्या पहिल्याच दिवशी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे ,शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद लबडे यांच्यासह बारा इच्छुकांनी एकोणाविस नामनिर्देशन पत्र नेले आहेत.त्यामळे पहिल्याच दिवशी उत्कंठा वाढण्यास प्रारंभ झाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त सुरेंद्र अरोरा यांनी एकवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासह हरियाणा या दोन राज्याची निवडणूक घोषित केली आहे. राज्यात 21 ऑक्टोबर रोजी 288 जागांसाठी संपन्न होणाऱ्या या निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त सुरेंद्र अरोरा यांनी एकवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासह हरियाणा या दोन राज्याची निवडणूक घोषित केली आहे. राज्यात 21 ऑक्टोबर रोजी 288 जागांसाठी संपन्न होणाऱ्या या निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे.आज पहिल्याच दिवशी बाळासाहेब तुकाराम दीक्षित,सुनील वसंत गंगूले,शिवाजी पोपटराव कवडे, विश्वनाथ सुधाकर पवार,आयुब कादर भाई शेख,अलीम छोटुभाई शहा,शाकिर आदम शेख,विजय सूर्यभान वहाडणे,प्रमोद लबडे,नानासाहेब मुरलीधर आभाळे, बाबुराव साळूबा पवार,सचिन कल्याणराव होन आदींनीं आपले अर्ज आज स्वतः किंवा आपल्या हस्तकांमार्फत नेले आहेत.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 3 लाख 45 हजार 191 इतकी असून 2019 या सालात एकूण मतदार 2 लाख 64 हजार,388 इतके आहेत.त्यात पुरुष मतदारांचा भरणा 1 लाख 34 हजार 996 असून महिला मतदार 1 लाख 29 हजार 496 इतका आहे तर तृतीयपंथी मतदार सहा आहेत.नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर असा आहे.त्यामुळे या लढतीत कोण-कोण अर्ज भरणार याकडे मतदारसंघातील नागरिकांचे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.