आरोग्य
कोपरगावात कोरोना रुग्ण तपासणी संच नाही,नगरसेवकांनी काढली वर्गणी !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषदेने कोरोना नियंत्रण समितीच्या नुकत्याच घेतलेल्या बैठकीत विविध चर्चा सुरु असताना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नगरसेवक म्हणून आपला काय सहभाग आहे आपण का काही वर्गणी गोळा करू नये ? अशी विचारणा केली असता नागरिकांच्या कोरोना तपासणीसाठी आवश्यक संचासाठी वर्गणी काढण्यास नगरसेवक संदीप वर्पे,मंदार पहाडे,योगेश बागुल आदींनी त्यास दुजोरा दिला होता.त्यातून हि संकल्पना पुढे आली असल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्यात कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.रुग्णांना रूग्णालयात,कोविड सेंटर मध्ये तपासणी संच,बेड,ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे.या पार्श्वभूमीवर कोविड उपचाराशी निगडीत विलगीकरण कक्ष,ऑक्सिजन सेंटर,ऑक्सिजन सिलेंडर,ऑक्सिजन बेड,सॅच्युरेटेड,ऑक्सिजन मशीनचा पुरवठा अशा कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी सरकार विविध आदेश जारी करत आहे मात्र खालच्या पातळीवर मात्र वस्तूस्थिती मात्र विदारक असून मोठा विरोधाभास दिसून येत आहे.आता कोपरगावचे उदाहरण घ्या ना.या शहरात कोविड सेंटर तर तयार आहे मात्र त्याला पुरविण्यासाठी प्राणवायूच नसल्याने ते अनेक दिवसापासून बंद आहे.दुसरे उदाहरण तालुक्यात शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत असताना या रुग्णांना तपासणीसाठी कोरोना तपासणी संचच नसल्याची धक्कादायक माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.रुग्णसंख्या कमी झालेली दिसत असली तरी त्यामागे खरे कारण हे कोरोना तपासणी संच नाही हे आहे.त्यामुळे अनेक नागरिक बाधित वा संशयित असूनही त्यांना पुढील उपचाराची प्राथमिक सुविधांचा नसल्याने नागरिकांना कोणी वाली उरला नसल्याचे आमचा प्रतिनिधीने छापले असल्याचा हा त्याला पुरावा मानला पाहिजे.त्यामुळे हे तपासणी सुविधा न मिळलेले रुग्ण अजून तालुक्यात संसर्ग पसरविण्याचे काम बिनबोभाट करत आहे.त्यामुळे शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत आहे.हीच स्थिती काही दिवस राहिली तर शहर व तालुक्याचे स्मशान बनायला वेळ लागणार नाही त्यामुळे सरकारने व लोकप्रतिनिधींनी तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.या बाबत आता नगरपरिषद व अन्य सहकारी संस्था यांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांना ऑक्सिजन प्रकल्प सुरु करण्याचे आवाहन करूनही तालुक्यातील सहकार सम्राट या पातळीवर पुढे आलेले नाही हे विशेष! या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे, व सर्वपक्षीय नगरसेवक यांनी घेतलेला पुढाकार नक्कीच दिशादर्शक मानला पाहिजे.यातून साधारण दोन लाखांचा निधी जमा होणार असून यातून नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रभागात किमान शंभर संच मिळतील अशी माहिती नगरसेवक मंदार पहाडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
आज नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष यांचे दालनात त्याची समक्ष अंमलबजावणी सुरु करण्यात आली त्यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,नगरसेवक संदीप वर्पे,मंदार पहाडे,जनार्दन कदम,आरोग्य सभापती शिवाजी खांडेकर,अल्ताफ कुरेशी,आदी मान्यवर उपस्थित होते.