आरोग्य
कोपरगावात रुग्णवाढ रोडावली,
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आजच्या सह दोन दिवसात नगर येथे २९० श्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ००० अँटीजन तपासणीत १६,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत १२ असे एकूण अहवालात एकूण २८ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १३६ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील महिला वय-०१ वर्षीय बालक रुग्णांचे निधन झाले आहे.कोरोना मृत्यूचे तांडव आता गल्ली बोळात आता गोंधळ घालु लागले असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे त्यामुळे शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही नागरिक सकाळच्या आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेबाबत अनावश्यक गर्दी करताना दिसत आहे,त्यात ते कुठलेही सुरक्षित अंतर पाळताना दिसत नाही हि धक्कादायक बाब आज निदर्शनात आली आहे.आज तर शहरात विघ्नेश्वर चौकात रस्ता वहातूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ५६ हजार १०० झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २२ हजार ३१७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ३१ हजार ९९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ७८४ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव तालुक्यात २३ दिवसात ५७ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.