कोपरगाव तालुका
कोपरगावात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा संवत्सर,भोजडे ग्रामपंचायत हद्दीत,
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव सह राज्यात आचारसंहिता लागू होऊन काही तास उलटत नाही व त्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तोच कोपरगाव तालुक्यातील संवत्सर,भोजडे,जवळके आदी ग्रामपंचायत हद्दीत पहिला आचार संहिता भंगाचा पहिला गुन्हा तालुक्याच्या आ. स्नेहलता कोल्हे ,प्रमोद लबडे यांच्याकडून घडला आहे.राज्य मार्गावरील तात्कालिक बनवलेले बसस्थानक व त्यावर लावलेले फलक आचारसंहिता भंग केल्याचा सबळ पुरावा देत असल्याचे स्पष्ट दिसत असून या बाबत आता निवडणूक अधिकारी गुन्हा दाखल करणार का असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी विचारला आहे.
कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी तालुक्यात आपल्या स्थानिक विकास निधीतून गावोगाव बस स्थानकांवर तात्कालिक बस शेड उभे केले असून त्यावर केवळ सांगाडे असून त्यावर आपल्या पाच वर्षाच्या पराक्रमाच्या (?) गाथा कोरल्या आहेत.मात्र निवडणूक आयोग आदर्श आचारसंहिता जाहीर करणार याचा सर्वच पक्षांना अंदाज होता व त्याबर हुकूम सर्वच पक्ष व त्यांचे कार्यकर्ते यांचे काम सुरु होते.मात्र सत्ताधारी गटाने याकडे साळसूदपणे दुर्लक्ष केले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघांसह राज्यातील 288 जागांसाठी विधानसभेची निवडणूक केंद्राचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल जाहीर केली असून कोपरगाव विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी नियुक्ती जाहीर करण्यात आली असून सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कालपासून आदर्श आचारसंहितेस प्रारंभ करण्यात आला असून शहर व तालुक्यातील राजकीय पक्षांचे फलक हटविण्यात आले असून जे हलविता येऊ शकत नाही ते झाकून टाकण्यात आले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत काल सांयकाळी सातच्या सुमारास तहसील कार्यालयात देऊन काही तासाचा कालावधी उलटत नाही तोच संवत्सर व भोजडे,जवळके या ग्रामपंचायत हद्दीत या आचारसंहितेचे धिंडवडे काढल्याचा सबळ पुरावा हाती आहे.तालुक्यातही हेच चित्र असल्याची माहिती मिळत आहे.
कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी तालुक्यात आपल्या स्थानिक विकास निधीतून गावोगाव बस स्थानकांवर तात्कालिक बस शेड उभे केले असून त्यावर केवळ सांगड असून त्यावर आपल्या पाच वर्षाच्या पराक्रमाच्या (?) गाथा कोरल्या आहेत.मात्र निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता जाहीर करणार याचा सर्वच पक्षांना अंदाज होता व त्याबर हुकूम सर्वच पक्ष व त्यांचे कार्यकर्ते यांचे काम सुरु होते.काल आचार संहिता लागू झाल्या बरोबर कोपरगाव नगरपरिषद व तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत असलेले फलक तातडीने हलविण्यात आले मात्र ग्रामीण भागात मात्र या बाबत अद्यप कुठलीही कार्यवाही झालेली दिसत नाही त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचा बार पहिल्याच दिवशी फुसका ठरला असल्याचे दिसून येत आहे.या बाबत हे अधिकारी आता कोणती भुमिका घेतात कि डोळ्यावर कातडे ओढून घेतात हे लवकरच कळणार आहे.