जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दारू पिण्यास पैसे दिले नाही,एकास चौघांनी केली मारहाण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीत पुणतांबा चौफुली या ठिकाणी हॉटेल अंबिका समोर दारूपिण्यास पैसे दिले नाही या कारणावरून राग येऊन आरोपी ऋषीकेश सोमनाथ सावंत रा.टिळकनगर,अविनाश अशोक भोपळे रा.दत्तनगर,मयूर संजय सुपेकर रा मोहिनीराजनगर,सनी जयराम पंडोरे रा.महादेवनगर सर्व रा.कोपरगाव यांनी फिर्यादी तरुण रामेश्वर रमेश सोनवणे (वय-25) रा.भाबड वस्ती पुणतांबा चौफुली जेऊर कुंभारी यास चौदा सप्टेंबरच्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास रस्ता अडवून शिवीगाळ करून जवळचा दगड उचलून मारून जबर दुखापत केली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी तरुण रामेश्वर सोनवणे याने दाखल केलेल्या फिर्यादीत पुढे म्हटले हे कि,आपण वरील आरोपीना दारू पिण्यास पैसे दिले नाही याचा राग येऊन ऋषिकेश सोनवणे याने आम्हाला पैसे देत नाही का असे म्हणून थांब तुला दाखवतो असे म्हणून जवळच पडलेला दगड उचलून आपल्या डोक्यात दोन ठिकाणी मारून दुखापत केली आहे.तर अविनाश भोपळे ,मयूर सुपेकर,सनी पंडोरे आदींनी आपल्याला खाली पाडून लाथाबुक्यांनी जोरजोरात मारहाण केली त्याच वेळी आरोपी ऋषिकेश सावंत याने त्याचे हातातील दगडाने आपल्या खुब्यावर जोरात मारून उजव्या खुब्यात फ्रॅक्चर केले आहे.या प्रकरणी आरोपी गंभीर जखमी झाल्याने व त्याकडे उपचारार्थ पैसे नसल्याने त्याने हा गुन्हा उशिराने म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.315/2019 भा.द.वि.कलम 326,324,323,504,34 प्रमाणे दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौंजदार एस.जी.ससाणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close