जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव खडकीत पावसाचे पाणी घुसले,कि घुसवले नागरिकांत चर्चेला उधाण

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या वायव्येस असलेल्या खडकी या उपनगरात रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या पावसाचे पाणी साडे अकराच्या सुमारास घुसल्याने या भागातील सुमारे दीडशे घरात पाण्याने थैमान घातले असून तेथील नागरिकांना आपली रात्र जागून काढावी लागली आहे.दरम्यान सदरचे पाणी हे पावसाचे नव्हते तर ते एका नेत्याच्या शेततळ्याचे भरून सोडण्यात आले असल्याची खात्रीलायक माहिती हाती आल्याने खडकीतील नागरिकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव शहर व परिसरात 21 सप्टेबरच्या रात्री साधारण साडे आठच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली त्याला खडकी,येसगाव, टाकळी, ब्राह्मणगाव परिसरही अपवाद नव्हता.त्यामुळे खडकी या उपनगरातील असणाऱ्या चरात पावसाचे पाणी एखाद्या तासाने येणे अभिप्रेत असताना ते रात्रि साडे अकराच्या सुमारास म्हणजे तीन तासाने उशिराने आल्याने येथील रहिवाशी नागरिकांत उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली असून तेथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिनेश पवार यांनी तर हे पाणी आपल्या जन्मापासून कधीही एवढे पाणी खडकीत आले नव्हते.

दरम्यान रात्री कोल्हे गटाचे विवेक कोल्हे यांनी रात्री साडे अकरानंतर या भागाचा माध्यम प्रतिनिधींसोबत दौरा केला असून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खडकीच्या वरच्या भागात जोरदार पावसामुळे हे पाणी आले असावे व दूरवरून पाणी आल्याने त्याला उशीर लागला असावा असा कयास व्यक्त केला आहे.नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने चंदू साठे यांच्या नेतृत्वाखाली पथक रात्रीच रवाना करून पाहणी केली आहे.उशिराने सदरचे पाणी ओसरले होते अशी माहिती दिली आहे.या खेरीज शारदानगर परिसरातही पावसाने कहर केला असून ते पाणी काढण्यासाठी पालिकेने आज सकाळी जे.सी.बी.च्या साहाय्याने प्रयत्न सुरु केले आहे.

सदरचे पाणी कोणीतरी सोडलेले असल्याचा आरोप केला असून याला जबाबदार कोण याची चौकशी करून पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी.तीन फूट पाणी नेमके कोठून आले याची चौकशी झाली पाहिजे.पाणी सोडणारे तेच त्याचे फिटरही तेच व पाहणी करणारेही तेच असा तोफगोळा विवेक कोल्हे यांचे नाव न घेता डागला आहे.अशी मागणी करून राजकीय अथवा प्रशासनाचा कोणीही प्रतिनिधी आपद्ग्रस्तांपर्यंत पोहचला नव्हता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close