शैक्षणिक
शिक्षक संघटनांची दर महिन्याला बैठक होणार-गटविकास अधिकारी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मधील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दर तीन महिन्याला सर्व संघटनांची एकत्र बैठक घेण्यात येईल असे आश्वासन तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी एका बैठकीत दिले आहे.
“विद्यार्थी शिक्षणासाठी इ.१ली ते आठवीच्या प्रत्येक शाळेसाठी संपुर्ण अभ्यासक्रमाचा डेमो एका खाजगी संस्थेने सादर केला,सदर अॅप चांगले असले तरी किंमत जास्त असल्याचे शिक्षक प्रतीनिधींनी सांगुन,विद्यार्थी व शिक्षकांना आर्थिक तोशीष न लागुन देता इतर निधितुन घ्यावे”-शिक्षक संघटना,कोपरगाव.
कोपरगाव पंचायत समिती सभापती यांचे दालनात सर्वच शिक्षक संघटनाच्या पदाधिकार्यासमवेत बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी उपसभापती अर्जुन काळे होते.
सदर प्रसंगी शिक्षण समीती सदस्य राजेश परजणे,गटविकासअधिकारी सचिन सुर्यवंशी,गटशिक्षणअधिकारी पोपट काळे,शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाचे नेते ज्ञानेश्वर माळवे,शिक्षक बँकेच्या माजी उपाध्यक्ष विद्युल्लता आढाव,विकास मंडळाचे विश्वस्त रमेश दरेकर,शिक्षक समितेचे संपर्कप्रमुख अशोक कानडे,शिक्षक परिषद सहकार्याध्यक्ष सुभाष गरुड,शिक्षक नेते मनोहर शिंदे,शिक्षक संघ तालुकाध्यक्ष विनोदकुमार सोनवणे (शिवाजीराव पाटील),शिक्षक संघ तालुका अध्यक्ष शशिकांत जेजुरकर (संभाजीराव थोरात),शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष दत्ता गरुड,इब्टाचे अध्यक्ष दत्तात्रय राऊत,शिक्षक परिषद अध्यक्ष दिपक झावरे,महेंद्र विधाते,प्रमोद जगताप,मनोज सोनवणे,लक्ष्मीकांत वाडीले,संजय खरात,सुभाष जगदाळे,सतीष जाधव,निलांबरी लाड आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर प्रसंगी पगार वेळेवर होणे,डी.सी.पी.एस बांधवांच्या हिशोब पावत्या मिळणे,मेडीकल बीले व अर्जीत रजा मंजुर होणे,फंड पावत्या विहीत वेळेत मिळणे,पगारासाठी सी.एम.पी.प्रणाली लागु करणे,तालुक्यात तोंडी आदेश न देता लेखी आदेश द्यावेत,सर्व केंद्रात एक वाक्यता असावी,सर्व शिक्षकांना कोविड लस द्यावी, विद्यार्थिनीचा ऊपस्थिती भत्ता एक रुपयांवरुन पाच रुपये करावा,कपात केलेला इनकमटॅक्स पं.स.स्तरावरुन भरणा व्हावा,सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन प्रकरणे करतांना सुसुत्रता असावी,हे व इतर अनेक प्रश्न शिक्षक प्रतिनिधींनी या प्रसंगी मांडले आहे.सदर प्रश्नांना ऊत्तर देतांना गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व तालुका पातळीवरील प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.
उपसभापती अर्जुन काळे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यास सर्वोच्च प्राधान्य असुन,सुसंवादावर शिक्षक प्रतीनिधींनी भर द्यावा असे सांगीतले.बैठकीच्या दरम्यान विद्यार्थी शिक्षणासाठी इ.१ली ते आठवीच्या प्रत्येक शाळेसाठी संपुर्ण अभ्यासक्रमाचा डेमो एका खाजगी संस्थेने सादर केला,सदर अॅप चांगले असले तरी किंमत जास्त असल्याचे शिक्षक प्रतीनिधींनी सांगुन,विद्यार्थी व शिक्षकांना आर्थिक तोशीष न लागुन देता इतर निधितुन घ्यावे असे संघटनांनी सांगितले. बैठक खेळीमेळीत पार पडली.दर तीन महिन्यांनी अशी बैठक घेण्याचे गटविकास अधिकारी यांनी मान्य केले.प्रशासनाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी पोपट काळे व शिक्षकांच्या वतीने ज्ञानेश्वर माळवे यांनी आभार मानले.