कोपरगाव तालुका
शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दयावा – फेफाळे
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर (प्रतिनिधी)
राज्यात त्यातले त्यात कोपरगांव तालुक्यात पुरेसा पाऊस नाही त्यामुळे शेतीचे अर्थकारण धोक्यात आले असून काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी काहीच नाहीही परिस्थिती कोपरगांव तालुक्यात भयावह आहेत्यासाठी शासनाने ३० जून ते २०१९ पर्यंत कर्ज माफी शेतक-यांना दयावी अशी मागणी संवत्सर सोसायटीचे माजी अध्यक्ष खंडेराव फेफाळे यांनी संवत्सर येथे एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.
संवत्सर येथील नामदेवराव परजणे सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी सेवा संस्थेचे संचालक विठ्ठलराव लोखंडे हे होते.
प्रथमतः शिवप्रतिमेचे व स्वर्गीय नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पुजन माजी अध्यक्ष कृष्णराव परजणे, संभाजी आगवन, पंढरीनाथ आबक, खंडू पाटील फेफाळे केशवराव भाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील पूर परिस्थिती मध्ये निधन झालेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली त्यानंतर सचिव ज्ञानेश्वर बोरनारे यांनी मागील सभेचे इतिवृत्त व व अहवाल वाचन करुन संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. चर्चेत लक्ष्मणराव साबळे, लक्ष्मण परजणे, भरत बोरनारे, विजय परजणे, शंकर नाना परजणे, चंद्रकांत लोखंडे, इ. भाग घेतला. फेफाळे म्हणाले की गेल्या दोन वर्षापासून या परिसरात दुष्काळ परिस्थिती असून शेतकरी सरकारच्या कर्ज माफीकडे वाट बघत असून त्यामुळे कर्जाची परतफेड करण्यात विलंब करीत आहे. त्यातले त्यात बँकेचे धोरनात बदल होत असल्याने नविन जिआरच्या वेगवेगळ्या अडचणी ज्या सभासदांनी पाचवर्षे कर्ज घेतले पाहिजे पाच वर्षातून दोनवेळा सर्वसाधारण सभेस हजर राहीले पाहीजे असा नियम केला आहे. त्यामुळे सभासदांना कर्ज देण्यात अडचणी निर्माण होत असून ऊ प्रकरणे ही व अडीअडचणी तालुका पातळीवर सोडवल्या पाहीजे. तसेच सोयाबीन विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही तो त्वरित मिळावा. तालुक्याचे नेतृत्वाने या प्रकरणी लक्ष दिले असते तर संपुर्ण तालुका हा दुष्काळ मुक्त झाला असता. व विमा मिळाला असता याला हे निष्क्रिय नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप केला आहे सभेस गोदावरी संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, सोमनाथ निरगुडे, बाळासाहेब दहे, सुभाष डरांगे, बबनराव भाकरे, विजय परजणे, पांडुरंग परजणे, रमेश बोरनारे, दत्तात्रय परजणे, बाबासाहेब भोसले, बंडुनाना परजणे, अविनाश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, बाबासाहेब भोसले, शंकर भोसले, प्रकाश शेटे, कृष्णा आबक व असंख्य सभासद उपस्थित होते.