नगर जिल्हा
घर बांधून देतो असे सांगून आदिवासी तरुणीवर शिर्डीत बलात्कार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहापुर येथील गरीब आदिवासी समाजातील पती पासुन दोन लहान मुलांसह विभक्त राहत असलेल्या २२ वर्षाच्या तरुणीचा आजारपण व पैशाची मदत तसेच तुला एक गुंठा जागेसह घर बांधून देतो तुझ्या लहान मुलांचे पालकत्व घेतो असे आमिष दाखवून शिर्डी व शहापुर येथील डाळींबाच्या बागेत तर घोटेवाडी ता. सिन्नर येथे बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले विरोध केला तर मारहाण देखील केली अशी फिर्याद या महिलेने शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये दत्तात्रय बादशहा वाळे (वय ५२)राहणार मंगळापुर ता संगमनेर याच्या विरोधात दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या बाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे.या महिलेला घेऊन शिर्डी पोलीसांच्या पथकाने ज्या हाॅटेल वर हा प्रकार घडत होता त्या हाॅटेलची पाहाणी करून या ठिकाणी हे येत होते असे चौकशी मध्ये तपासात पुढे आल्याने चौकशी कामी हाॅटेलची रोजनिशी ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत पोलीस चौकशी करीत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर हि माहिती संशयित आरोपी दत्तात्रय वाळे याला पोलीस ठाण्यामध्ये बोलावण्यात आले होते मात्र तो हजर झालेला नव्हता. या महिलेने आपल्यावर होणा-या अत्याचाराची कैफियत सावळी विहीर येथील अन्याय अत्याचार भ्रष्टाचार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल गांगुर्डे यांच्या कानावर घातली होती. या संघटनेच्या पुढाकाराने या महिलेला धीर व आधार देऊन शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांच्या लक्षात आणून दिली.त्या त्या नंतर विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना सागताच तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा रजिस्टर न ८९४/२०२९भादवी ३७६,३२३,५०४,५०६व तरुणी आदिवासी समाजातील असल्यामुळे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हे वाढिव कलम लावण्यात आले असून या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहे