जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा सहकाऱ्यांसह हॉटेल व्यावसायिकावर हल्ला,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेच्या नगरसेवकांना काय बाधा झाली कळायला मार्ग नाही सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाच्या प्रतापाची धूळ खाली बसते न बसते तोच लागोपाठ घडणाऱ्या दुसऱ्या घटनेत कोपरगाव शहरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवक संदीप पगारे याने आपला सहकारी नितीन कोपरे व अन्य सहकाऱ्यांनी यांनी शहरातील मध्यवर्ती सुदेश थिएटर चौकातील येवले चहाच्या दुकानात जाऊन पाणी शुद्धीकरण यंत्राचे पैसे मागीतल्याच्या तात्कालिक रागातून हॉटेल चालक गोराम मेंडगे यांच्या श्रीमुखात भडकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या मुले शहरातील व्यावसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगावतील नव्याने आपल्या चहाचे हॉटेल सुरु करणाऱ्या गौराम मेंगडे यांनी कोपरगाव शहरातील पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि,आपण या शहरात नवीन हॉटेल व्यवसाय सुरु केला असून या ठिकाणी आपल्या आई वडीलांसह राहतो.सुदेश थिएटर चौकात आपण चहाचे दुकान चालवत आहे.नितीन कोपरे यांचे कडून आपण पाण्याचा आर. ओ. यंत्र बसविलेले आहे.तेरा सप्टेंबरच्या रात्री सडे आठच्या सुमारास आपण आपली आई,मनीषा मेंगाडे व वडील गौराम मेंगाडे.आदी दुकानावर असताना नितीन कोपरे व नगरसेवक संदीप पगारे हे दोघे व त्यांच्या बरोबर आणखी दोन अनोळखी इसम आले व त्यांनी आम्हाला आर.ओ. चे पैसे मागून तुम्ही आम्हाला फोनवरून इंग्लिश मधून शिवीगाळ करता का ? असे म्हणून आम्हाला शिवीगाळ करू लागले.त्यावर आपण नितीन कोपरे यास दादा आपण काय असेल ते बोलू म्हणालो असे म्हणालो असता कोपरे यांच्या बरोबर आलेल्या अनोळखी इसमाने आपल्या श्री मुखात भडकावली व संदीप पगारे याने आम्हाला ओळखले का ? मी नगर सेवक आहे.यांचे दहा हजार रुपये देऊन टाका नाही तर तुमचे मशीन चालू किंवा नाही आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. या आशयाची फिर्याद कोपरगाव शहरात दाखल केली आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपस पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close