जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात चोख बंदोबस्तात गणेश विसर्जन संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव( प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात गणेशोत्सव पोलीस बंदोबस्तात उत्साहात संपन्न झाले असून या कार्यक्रमाला कुठलेही गालबोट लागले नाही.कोपरगाव शहरात एकूण 120 गणेश मंडळांनी आपले गणपती स्थानापन्न केले होते.तर तालुक्यात एकूण 177 गणपती बसविण्यात आले होते एकूण गणपतींची संख्या 297 होती.कोपरगाव शहरात दहा सप्टेंबर रोजी दोन गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते तर तालुक्यात 11 सप्टेर रोजी 26 तर बारा सप्टेंबर रोजी 151 गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे.शहरात एक पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,एक सहाय्यक पोलीस निरीक्षक,तीन पोलीस उप निरीक्षकांसह नव्वद पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.तर तालुक्यात पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचेसह दोन अधिकारी,बावीस पोलीस,सातारा गृहरक्षक दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.पोलीस बंदोबस्त चोख असल्याने असामाजिक तत्वांना जरब बसल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

या वेळी गोदावरी नदी मोठ्या प्रमाणावर वाहती असल्याने निर्माल्या बाबत आदिनाथ ढाकणे यांच्या गोदा प्रतिष्ठानची लायन्स क्लबची सहाय्यित निर्माल्य कुंडी फक्त लक्षवेधून घेत होती.त्याच बरोबर कोपरगाव पालिकेच्या स्वच्छता विभागाने निर्माल्यासाठी एक कचरा गाडी उभी करून गोदावरी दूषित होणार नाही याची खबरदारी घेतली होती.

सार्वजनिक गणेशोत्सव कोपरगाव शहरात व तालुक्यात मोठ्या उत्सहात विविध गणेशोत्सव मंडळांनी साजरा केला.कोपरगाव शहरात दुपारी बाराच्या सुमारास पहिल्या गणेशाचे गोदावरी गौतमीत विसर्जन करण्यात आले.त्यानंतर दुपारी तीन नंतर या उत्सवास वेग आला.बल्लाळेश्वर गणेश मंडळ,त्या नंतर इंदिरा पथचे विजेता तरुण मंडळ,यांनी यात आघाडी घेतली.त्या नंतर मधील काळात या बाबत गती कमी होती,त्यांनतर शिवराय तरुण मंडळ हिंदुवाडा तरुण मंडळ यांचा भगवे उपरणे व पंधरा नेहरू,सलवार हा पेहराव लक्ष वेधून घेत होता.मुंबादेवी तरुण मंडळाने या बाबत विविध नृत्य बसविण्यासाठी जास्त मेहनत घेतल्याचे दिसून आले.लहान मुलींचे नृत्य विशेष लक्ष खेचून घेत होते या खेरीज मर्दानी खेळ,टेंभ्याचे वेगवेगळे खेळ लक्ष वेधून घेत होते.निवारा येथील साई समर्थ प्रतिष्ठानने ट्रकवर आकर्षक सजवलेला भव्य सेट उभा करून त्यात आपल्या आवडत्या गणेशाला स्थानापन्न केले होते.वास्तविक हे सर्वात मोठे नियोजन ठरेलले दिसत होते.

एका मंडळाने राजकीय नेत्यांचे फोटो लावताना बरीच खबरदारी मेहनत घेतलेली होती.त्यात सेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे व ज्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी नेत्यांचे आयुष्यभर उभे वैर होते अशा नेत्यांची माळ लावून आगामी विधानसभेचे वारे कोणत्या दिशेने वाहणार आहे याची चुणूक दाखवली होती त्याची प्रत्येकजण दखल घेत होते.

त्या पाठोपाठ कोर्ट रोड येथील क्रांती युवक संघटना,हिरवा नेहरू शर्ट व पांढरे सलवार यांनी लक्ष वेधून घेत होता.त्या नंतर शिवनेरी तरुण मंडळ,गांधीनगर येथील सेनेचे शहरं प्रमुख सानी वाघ यांचा माता वैष्णोदेवी ग्रुप,लक्ष्मीनगर येथील संघर्ष तरुण मंडळ,शुक्लेश्वर बेट तरुण मंडळ,टिळकनगर येथील जय लक्ष्मीआई भक्त्ती मंडळ,अंबिका चौक येथील गुरुदत्त युवक संघटना यांनी कृष्ण वर्णीय पेहराव लक्ष वेधून घेत होता.विनोद राक्षे यांच्या सनी ग्रुपने आपली लीला दाखवली असल्याचे आढळून आले आहे,तत्पच्छात गोखरुबाबा गल्ली येथील छत्रपती प्रतिष्ठान,एस.जी. शाळा रोड येथील धर्मयोद्धा प्रतिष्ठान,दत्तनगर येथील प्रतिष्ठान,यांनी आपला जलवा दाखवला असला तरी त्यावेळचे नियोजन कोपरगाव नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी चोख ठेवले होते.

वास्तविक दारूचा आणि श्री गणेशाचा चुकूनही काही संबंध नाही श्री गणेश हे सात्विक दैवत मानले जाते तरीही बऱ्याच गणेश मंडळाचे कार्यकर्ते झिंगुन नाच करताना दिसत होते व या मंडळांची कलाकुसर पाहण्यासाठी फिरणाऱ्या माता भगिनींना आपले नाक झाकून पुढे जावे लागत होते याला आपण काय म्हणणार ?

कोपरगाव नगरपरिषदेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्यासपीठ ठेऊन तेथेच नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या धर्मपत्नी उमा वहाडणे या आलेल्या गणेश मंडळांच्या मूर्तीस विधिवत पूजन करून सर्व मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम न्याहाळत होत्या.त्याच्या सोबत मुख्यधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी विश्वास गोर्डे.विविध विभागाचे प्रमुख आवर्जून हजर होते तथापि सत्ताधारी गटाने मात्र या व्यासपीठावर अघोषित बहिष्कार टाकलेला दिसत होता.एवढेच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी राष्ट्रवादीही चार हात दूरच असल्याचे दिसत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close