जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

कोपरगाव तालुक्यात विविध रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मोर्वीस येथे आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत १३ लक्ष निधीतून धामोरी फाटा ते मोर्विस रस्ता खडीकरण कामाचे व मोर्विस ते मायगाव देवी रस्ता मुरुमीकरण कामाचे भूमिपूजन तसेच १० लक्ष निधीतून लासलगाव-शिर्डी रस्ता ते तीनचारी कॅनॉल रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात शुभहस्ते पार पडले आहे.

मागील काही वर्षात दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती.त्याप्रमाणेच चासनळी येथील लासलगाव-शिर्डी रस्ता ते तीनचारी कॅनॉल रस्त्याची देखील दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता आता या रस्त्यांमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मोर्वीस येथील स्थानिक नागरिकांच्या रहदारीसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या धामोरी फाटा ते मोर्विस या रस्त्याकडे मागील काही वर्षात दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती.त्याप्रमाणेच चासनळी येथील लासलगाव-शिर्डी रस्ता ते तीनचारी कॅनॉल रस्त्याची देखील दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. काळे यांनी या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देवून या रस्त्यामुळे नागरिकांची सुटका होणार आहे. मतदार संघातील खराब झालेल्या सर्वच रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून इतरही खराब रस्त्यांचा लवकरच कायापालट करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सचिन चांदगुडे, अशोक तिरसे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, नारायण मांजरे, दिलीप चांदगुडे, प्रभाकर चांदगुडे, सुभाष गाडे, अशोक मोरे, भास्कर चांदगुडे, विकास चांदगुडे, आण्णा चांदगुडे, प्रभाकर शिंदे, संदीप जाधव, महेश आहेर, कैलास आहेर, राहुल जगधने, सर्जेराव सोनवणे, साहेबराव सोनवणे, प्रभाकर आहिरे, शंकरराव सोनवणे, सोमनाथ पारखे, चंद्रभान सोनवणे, प्रकाश सोनवणे, भगवंत सोनवणे, पुंडलिक माळी, भगवान माळी, प्रकाश आहेर, भाऊसाहेब गाडे, शिवदत्त गाडे शरद वाघ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close