कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील अवकाळीचे पंचनामे करा-आ.काळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात रविवार दि.२१ मार्च रोजी अचानक आलेला सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे व काही ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे तसेच द्राक्ष, चिक्कू, डाळींब, टरबूज आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे आ.आशुतोष काळे यांनी पहाणी करण्याच्या दिलेल्या सूचनेवरून तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी पाहणी केली आहे.
“कोपरगाव तालुक्यात गारपीठ झाल्यामुळे येत्या काही दिवसात काढणीला आलेल्या गहू,कांदा पिकांचे तसेच टरबूज,द्राक्ष, चिक्कू, डाळिंब,आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, शहापूर,बहादरपूर, जवळके,सोनेवाडी, बहादराबाद,मंजूर,सांगवीभुसार,रवंदे,वेळापूर आदी गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे“-आ.आशुतोष काळे.
कोपरगाव तालुक्यात रविवार दि.२१ मार्च रोजी दुपारी ४.०० नंतर वातावरणात अचानक बदल होऊन आलेल्या वादळी वारा व मुसळधार पाऊस व काही ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे येत्या काही दिवसात काढणीला आलेल्या गहू,कांदा पिकांचे तसेच टरबूज,द्राक्ष, चिक्कू, डाळिंब,आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, शहापूर,बहादरपूर, जवळके,सोनेवाडी, बहादराबाद,मंजूर,सांगवीभुसार,रवंदे,वेळापूर आदी गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.आ.काळे यांनी तातडीने तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना सूचना करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास सांगितले होते. त्या सूचनेनुसार तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी नुकसानीची पाहणी केली आहे.
सदर प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कृषी अधिकारी अशोक आढाव,पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सुनील शिंदे,सचिन रोहमारे,राहुल जगधने,गोकुळ पाचोरे,देवेन रोहमारे,नंदकिशोर औताडे,संतोष वाके,राजेंद्र पाचोरे,वसंत पाचोरे,गोकुळ पाचोरे,रामनाथ पाडेकर,शिवाजी राहणे,गोपीनाथ रहाणे आदी उपस्थित होते.
झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविला जाईल अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिली आहे. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे वीजप्रवाह देखील खंडीत झाला होता. त्याबाबत देखील आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणला सूचना देवून विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे सांगितले आहे.