आरोग्य
कोपरगावात रुग्णवाढ चिंताजनक,टाळेबंदीची शक्यता वाढली
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ५१३ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ३२० असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.३९ टक्के आहे.तर एकूण २२ हजार २७८ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ८९ हजार ११२ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १५.७७ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार १४४ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८९.५० टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.गत वर्षीचा एक दिवसीय ६८ रुग्णवाढीचा विक्रम आजच्या आकडेवारीच्या मोडला असून या विक्रमी रुग्णवाढीमुळे आता कोपरगाव शहर व तालुक्यावर टाळेबंदीची तलवार टांगली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८० हजार ८९२ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०२ हजार ४७२ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ७७ हजार २४२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १७७ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-११७ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहर बोरावके वस्ती पुरुष वय-३९,आर.के.कोपरगाव पुरुष वय-४१,३५,६५,२४,३१,महिला वय-२६,श्रद्धांनगरी पुरुष वय-३३,महिला वय-४६,४४,सप्तर्षी मळा महिला वय-६४,४०,पुरुष वय-६५,१९,१८,इंदिरापथ पूरुष वय-२१,५१,३४,०८,महिला वय-३५,गोकुळनगरी पुरुष वय-४४,महिला वय-४०,साईसिटी पुरुष वय-२५,महिला वय-३०,शिवाजी रोड पुरुष वय-४१,बालाजी रोड पुरुष वय-२०,इंदिरानगर पुरुष वय-५१,गांधीनगर पुरुष वय-२४,महिला वय-७०,साईनगर पुरुष वय-५२,महिला वय-५०,कहार गल्ली पुरुष -३८,६४,महिला वय-५५,गजानन नगर महिला वय-३८,लक्ष्मी नगर पुरुष वय-५२,महिला वय-५२,रेव्हून्यू कॉलनी पूरुष वय-७३,प्राजक्ता प्लाझा पुरुष वय-३४,येवला नाका पुरुष वय-५६,बैल बाजार महिला वय-६१,खाटीक गल्ली पुरुष वय-४४,येवला रोड पुरुष वय-३८,श्रद्धा कॉम्प्लेक्स पुरुष वय-३८,सराफ बाजार पुरुष वय-३२,३०,महिला वय-३०,३७,काळे मळा पुरुष वय-५५,श्रद्धा टॉवर महिला वय-५९,रचना पार्क पुरुष वय-३५,स्टेशन रोड पुरुष वय-३६,जानकी विश्व पुरुष वय-६३,सह्याद्री कॉलनी पुरुष वय-२१,लक्ष्मी हॉटेल पुरुष वय-६७,आदींचा समावेश आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यात धारणगाव पुरुष वय-१९,महिला वय-४५,जेऊर पाटोदा पुरुष वय-४२,महिला वय-५६,३७,खोपडी पुरुष वय-३४,संवत्सर महिला वय-२४,वारी पुरुष वय-४९,महिला वय-३३,४६,२२,पोहेगाव महिला वय-५९,७०,जेऊर पुरुष वय-३९ महिला वय-२५,कुंभारी पुरुष वय-५८,६४,४०,महिला वय-६०,सुरेगाव पुरुष वय-२०,२२, महिला वय-३८,११,कोळगाव थडी पुरुष वय-३०,शिंगणापूर पुरुष वय-५८,२७,११,०२,६०,४२,३१,महिला वय-१८,२४,५७,५०,२५,५३,कोळपेवाडी पुरुष वय-३७,महिला वय-२२,वेळापूर महिला वय-६८,चासनळी पुरुष वय-३२,मळेंगाव थडी पुरुष वय-३९,३७,महिला वय-३५,ब्राम्हणगाव पुरुष वय-१४,६०,६१,कोकमठाण महिला वय-३२,६५,जंगली महाराज पुरुष वय-७०,येसगाव कोल्हेवस्ती पुरुष वय-९३ महिला वय-६०,मल्हारवाडी काकडी पुरुष वय-५८,४८महिला वय-६०,सांगवी भुसार पुरुष वय-६८,३३,महिला वय-६४,चांदेकासारे पुरुष वय-३३,खोपडी पुरुष वय-७६,आदींचा समावेश आहे.
दरम्यान या रुग्णवाढीबाबत तालुका वैद्यकीय अधिकारीं डॉ.संतोष विधाते यांचेशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता या रुग्ण वाढीबाबत कारण सांगताना त्यांनी,”आता आरोग्य विभागाला आपले धोरण बदलावे लागणार आहे.आज पर्यंत घरात रुग्ण असेल तर घरात विलगीकरण करण्यास परवानगी देण्यात आली होती त्या मुळे नागरिकांना व रुग्णांना त्याचे गांभीर्य नव्हते त्यामुळे आता पुढील काळात हे धोरण बदलले जाणार असून घरात रुग्ण असेल तर आता त्याची रवानगी हि खाजगी अथवा सरकारी रुग्णालयात उपचारार्थ करण्याची सक्ती करण्यात येणार आहे.सक्तीचे विलगीकरण धोरण करून स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.त्याला काय प्रतिसाद मिळतो यावर पुढील टाळेबंदीचे धोरण ठरविण्यात येणार आहे”.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला होता तो आज मोडीत निघाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.सरकारने तसे आज नवीन नियम जाहीर केले आहे.