कोपरगाव तालुका
आपत्कालीन मदतकार्य करणाऱ्यांचे कार्य दखलपात्र-ब्रिगेडियर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अनेक आपत्कालीन संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना मदतकार्य आणि सेवा देणार्यांचे कार्य कौतुकास्पद असून देशप्रेमाने भारावलेले व्यक्तीमत्व आणि त्यांचे संस्थांचे माध्यमातून होत असलेले समाज उपयोगी कार्य अतुलनीय असल्याचे सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष,माजी खासदार,सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले आहे.
नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती,अपघात यासारख्या घटनांना आपल्याला सामोरे जावे लागते.आपत्ती कोणतीही असो त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते.आपत्ती काळात स्वत:चा, कुटुंबाचा, समाजाचा व गावचा बचाव करायचा असेल तर योग्य ती पूर्वतयारी,मानसिकता तयार करणे आवश्यक आहे हे कार्य कोपरगावात चांगले सुरु आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी हि भेट दिली आहे.
भारत सरकारचे स्वच्छतादूत व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समन्वयक सुशांत घोडके यांचे येथे सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष,माजी खासदार,सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत सदिच्छा भेट दिली.या प्रसंगी माजी सैनिक कै.अप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करत असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली.याप्रसंगी सैनिक फेडरेशनचे सचिव नितीन गौनकर,माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल होन, भाऊसाहेब निंबाळकर,युवराज गांगवे, सेवानिवृत्त एन.एस.जी.कमांडो विकास मुळेकर,सूर्यतेजचे अतुल कोताडे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी श्री.सावंत यांचा शाल,सन्मानचिन्ह,स्वच्छ भारत संकल्पना,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या भेटीत आपत्ती व्यवस्थापनात गेल्या १८ वर्षात केलेल्या नियोजनाबद्दल केलेल्या कार्याविषयी माहिती घेतली तसेच सूर्यतेज संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतांना उपक्रमांचे व दिलेल्या सेवेचे कौतुक केले.कोविड सारख्या संकटकाळी अगदी सुरुवातीच्या वाटसरुंपासून अनेक प्रसंगी धाडसाने नागरिकांना मदत केल्याबद्दल अभिनंदन करुन देशप्रेम रक्तात,मनात भिनलेली व्यक्ती त्या उर्जेतून कार्य करत राहतात.ईतरांनाही प्रेरणा देतात.असे सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.