अर्थकारण
राज्याच्या विकासाला चालना देणारा देणारा अर्थसंकल्प-आ.काळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जे शेतकरी तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज घेऊन दिलेल्या मुदतीत परत करतील त्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळणार आहे हि बाब शेतकऱ्यांसाठी अतिशय स्वागतार्ह आहे.कृषी बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या योजनेची केलेली घोषणा तसेच कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १५०० कोटी रुपयांचा महावितरणला दिले जाणार. तसेच ‘विकेल ते पिकेल’ योजनेला २१०० कोटी रुपयांची तरतूद करून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अर्थमंत्री ना.अजित पवार यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया कोपरगावचे आ.काळे यांनी नुकतीच दिली आहे.
जागतिक महिला दिनाचे दिवशी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी केलेल्या घोषणा स्वागतार्ह आहे.ग्रामीण भागातील १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत एस.टी.प्रवास,घरकाम करणाऱ्या महिलांसाठी संत जनाबाई सामाजिक कल्याण योजना,घर विकत घेत असताना कुटुंबातील महिलेच्या नावे मुद्रांक शुल्क भरल्यास त्यावर स्टँप ड्युटीमध्ये १ टक्के सूट देण्यात येणार आहे.महिलांच्या बाबतीत असे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून त्यामुळे महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे.महिला,शेतकरी,कष्टकरी,उद्योग,रस्ते,पाणी योजना,पशु संवर्धन, तरुण, दुर्बल घटक,कामगार,विद्यार्थी आदी सर्वच घटकांचा विचार करून वैश्विक कोरोनाचे संकटाचे आव्हान पेलून राज्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.