सण-उत्सव
शिरसगावात शिवजयंती उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
शिरसगाव-(वार्ताहर)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगांव सावळगाव पंचक्रोषीतील तरुणांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स.१८७० साली शिवजयंती सुरू केली जी पहिली शिवजयंती होती.आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.
२०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली होती, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली आहे.शिरसगाव परिसरातही ती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन करत व वाढत्या कोरोना चा प्रादुर्भाव लक्ष्यात घेत सर्वाना खबरदारीचा उपाय म्हणून राहुल संजय गायकवाड यांच्या वतीने स्पर्धकांना व उपस्थितांना मुखपट्यांचे वाटप करत कार्यक्रमास सुरुवात झाली.
या वेळी शालेय विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी शिरसगावचे पोलिस पाटील विलासराव जाधव,माजी सरपंच अशोकराव उर्कीडे,ग्रामपंचायत सदस्य कैलास मढवे,शिवाजी जाधव,शिवाजी गायकवाड,विजय कापसे,देविदास गवांदे,गोविंद पंचमेंढे,भारत वाघ तसेच शिरसगाव,सावळगाव,तीळवणी पचंक्रोशीतील ग्रामस्थ,युवक वर्ग व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवाजी गायकवाड यांनी महाराजांची महती सांगितली व शिवाजी जाधव यांनी कोरोना विषयी जनजागृती करत आपली व आपल्या परिवारातील सदस्याचा कोरोना या महाभयंकर रोगापासून बचाव कसा करायचा यावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजय महाले यांनी तर आभार भागीनाथ गायकवाड यांनी मांडले.