आरोग्य
तिर्थंकर हॉस्पिटलचे उदघाटन उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील संभाजी चौकात डॉ.अमोल अजमेरे व डॉ.रवींद्र गायकवाड यांनी नुकतीच उभारणी करण्यात आलेल्या तिर्थंनकर हॉस्पिटलचे उदघाटन कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली आहे.
प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अमोल अजमेरे व जनरल फिजिशियन डॉ.रवींद्र गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज चौकानजीक नुकतेच एकवीस खाटांचे सुसज्य रुग्णालय उभारण्यात आले आहे.त्यात अतिदक्षता विभाग,मेडिकल नर्सिंग होम,सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम,मल्टिपॅरामॉनिटर्स,डिफिब्रिलेटर,वातानुकुलीत खोल्या,इंफुजन पंप,अत्याधुनिक प्राणवायू कक्ष,एक्सरे सुविधा,कॉम्पुटराईजड ई.सी.जी.,मेडिकल स्टोअर्स,पॅथॉलॉजी लॅब,सेमी डिलक्स रूम आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.
कोपरगाव येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अमोल अजमेरे व जनरल फिजिशियन डॉ.रवींद्र गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज चौकानजीक नुकतेच एकवीस खाटांचे सुसज्य तिर्थंनकर रुग्णालय उभारण्यात आले आहे.त्यात अतिदक्षता विभाग,मेडिकल नर्सिंग होम,सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम,मल्टिपॅरामॉनिटर्स,डिफिब्रिलेटर,वातानुकुलीत खोल्या,इंफुजन पंप,अत्याधुनिक प्राणवायू कक्ष,एक्सरे सुविधा,कॉम्पुटराईजड ई.सी.जी.,मेडिकल स्टोअर्स,पॅथॉलॉजी लॅब,सेमी डिलक्स रूम आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.त्याचे उद्घाटन तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.सदर प्रसंगी कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे,गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,उद्योजक कैलास ठोळे,अरविंद भन्साळी,श्रीरामपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ कुमार चोथानी,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,डॉ.राजेश माळी,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते डॉ.अजय गर्जे,डॉ.प्रीतम जपे,डॉ.विजय कोठारी,दिलीप अजमेरे,राहुल अजमेरे,आनंद अजमेरे,ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोरावके,आदी मान्यवरांसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.