कोपरगाव तालुका
संवत्सर शिवारात समृद्धीची रोड वहातुक रोखली
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-संवत्सर-(प्रतिनिधी)
राज्यातील सत्तावीस जिल्ह्यांना भविष्यात वेळ आणि पैसा वाचविण्यात अहंम भूमिका रोखणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गाचे वेगात सुरु असलेले काम आज कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील नागरिकांनी अचानक रोखल्याने गायत्री कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली असल्याचे चित्र आहे.अखेर ग्रामस्थांपुढे या अधिकाऱ्यांना आपली चूक कबुल करावी लागून आपण या भागातील नादुरुस्त झालेले रस्ते दुरुस्त करून देण्याच्या बोलीवर ग्रामस्थांनी काम पुन्हा सुरु करण्यास संमती दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान दोन गट या विषयावरून आमने-सामने आले होते.
“पंतप्रधान सडक योजनेतून सन-२०१२ साली उभारण्यात आलेला रस्ता या कंपनीने होत्याचा नव्हता करून टाकला आहे.या मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांची जीवित व वित्तीय हानी होत आहे.संजीवनी सहकारी व सोमय्या ऑरगॅनिक कारखाना यांचीही अवजड वाहतूक याच मार्गावरून जात असल्याने या मार्गाची वाताहत झाली आहे.त्यांनी हि जबाबदारी संयुक्तपणे स्वीकारून हा मार्ग पूर्ववत करून द्यावयाच्या प्रश्नी दोन दिवसात बैठक घेण्याचे कम्पनीने कबुल केले आहे.-विवेक परजणे,माजी उपसरपंच संवत्सर.
मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा ८ पदरी, २१२० मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग आहे.हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडेल.हा महामार्ग १० जिल्ह्ंयातून,२६ तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल.या प्रकल्पासाठी ५६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.हा महामार्ग येत्या एक मे पर्यंत शिर्डी ते नागपूर दरम्यान सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी गत महिन्यात जाहीर केले आहे.अशातच या महामार्गाचे काम नेमके कोपरगाव तालुक्यातच मंद गतीने सुरु आहे.गायत्री हि बांधकाम करणारी कंपनी अद्यापही गती वाढविण्यास सक्षम ठरलेली नाही.सर्वाधिक मंद गतीने या तालुक्यात काम सुरु असताना आज दुपारी संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी हे काम बंद पाडले आहे.कारण या कंपनीने या भागातील रस्त्यांचा वापर करून हा महामार्ग उभारण्याचे काम सुरु ठेवल्याने या महामार्गावरील अवजड वहानांनी नजीकच्या रस्त्यांची पुरती वाट लावली आहे.याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही त्यांनी दखल घेतली नाही.खड्डे बुजवले नाही.की उडणाऱ्या धुळीपासून संरक्षण करण्यासाठी या मार्गावरील रस्त्यावर पाणीही मारले नाही.परिणामस्वरूप या ग्रामस्थांची ऐतराजी झाली असून त्यांनी आज अचानक काम बंद करून या कंपनीला जाब विचारला आहे.संवत्सर ते कान्हेगाव या मार्गाची उभारणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सन-२०१२ साली केली होती.मात्र मुरूम व अन्य अवजड वाहतूक करणाऱ्या डंपर आदी वहानांनी त्याची वाट लावली आहे.त्यामुळे हे काम बंद करून हि चपराक दिली आहे.दरम्यान या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कारणावरून परजणे व कोल्हे गट आमने-सामने आले होते.व त्यांच्यात वादावादी झाली होती मात्र जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग शिंदे यांनी या प्रश्नी मध्यस्ति करून दोन्ही गटाला शांत केले आहे.
याबाबत संवत्सर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विवेक परजणे यांची याबाबत प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की,”पंतप्रधान सडक योजनेतून सन-२०१२ साली उभारण्यात आलेला रस्ता या कंपनीने होत्याचा नव्हता करून टाकला आहे.या मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांची जीवित व वित्तीय हानी होत आहे.संजीवनी सहकारी व सोमय्या ऑरगॅनिक कारखाना यांचीही अवजड वाहतूक याच मार्गावरून जात असल्याने या मार्गाची वाताहत झाली आहे.त्यांनी हि जबाबदारी संयुक्तपणे स्वीकारून हा मार्ग पुरवत करून द्यावा अशी मागणी केली आहे.