कोपरगाव तालुका
नगराध्यक्ष वहाडणे यांच्या हस्ते पोलिओ डोस देण्याचा शुभारंभ
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आज दि.३१ जानेवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील पाच वर्षांपर्यंतच्या लहान वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार येत असून त्याचा शुभारंभ आज डॉ.ए. पी.जे.कलाम सुविधा केंद्रात कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे.
सर्व जनतेने आपल्या घरातील,व आलेल्या पाहुण्यांची, शेजारील,नविन जन्म झालेल्या वय ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना नजिकच्या पोलिओ बुथवर पोलिओ डोस पाजणे गरजेचे आहे.त्याला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे-डॉ.कृष्णा फुलसुंदर,वैद्यकीय अधीक्षक,कोपरगाव ग्रामीण रुग्णालय.
पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे.पोलियोच्या उपसर्गाच्या ९० टक्के घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १ टक्क्या पेक्षा कमी रुग्णांच्याबाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या ‘गतिप्रेरक न्यूरॉनना’ अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते.याला यूरोपीय देशात २००२ मध्ये याचे निर्मूलन केले गेले तर भारतात सरकारने १९९५ साली सुरू करण्यात आलेल्या पल्स पोलियो योजने मुळे भारत देश पूर्णपणे पोलियोमुक्त होऊ शकला असून भारतात २०१४ मध्ये निर्मूलन करण्यात आले आहे.मात्र आगामी काळात याचे उच्चाटन होण्यासाठी लस देणे गरजेचे आहे.त्यामुळे शासन हा उपक्रम आजच्या दिवशी राबवत आहे.
कोपरगाव तालुक्यात ६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे मार्फत ० ते ५ वर्ष वयोगटातील ३२०१७ बालकांना पोलिओ डोस येणार आहेत.२८१ पोलिओ केंद्रावर ५७९ कर्मचाऱ्यांमार्फत हे डोस देण्यात येत आहेत.यामध्ये आशा,अंगणवाडी सेविका,ए.एन.एम.एम.पी. डब्ल्यू,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यिका,वैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग लाभला असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे.सर्व जनतेने आपल्या घरातील,व आलेल्या पाहुण्यांची, शेजारील,नविन जन्म झालेल्या वय ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना नजिकच्या पोलिओ बुथवर पोलिओ डोस पाजणे गरजेचे आहे.त्याला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिंण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.