जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावात तालुक्यात शांततेत मतदान संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायत निवडणूक संपन्न झाली असून आता राजकीय निरिक्षकांचे लक्ष आगामी निवडणूक निकालाकडे लागले आहे.आज निवडणूक मतमोजणीला आवश्यक उमेदवारांना ओळखपत्र देण्याचे काम वेगाने सुरु होते त्याला इच्छुकांनी प्रतिसाद दिला आहे.मतमोजणी तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी नऊ वाजता सुरु होऊन दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

राज्‍य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे.या निवडणुकीत एकुण ९७५ उमेदवार अर्ज दाखल झाले होते.त्यातील ९६४ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.त्यातील ३५३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २७९ जागांसाठी ६११ उमेदवारांनी निवडणूक लढवली.या सर्व उमेदवारांनी भवितव्य शुक्रवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० ते ५:३० या वेळेत १११ मतदान केंद्रावर झालेल्या यांत्रिकी मतदानात २७४७० पुरुषांनी व २५०३० स्त्रीयांनी असे एकूण ५२५०० मतदारांनी मतदान नोंदवले.

यात ग्रामपंचायती नुसार उक्कडगाव-एकूण मतदार-१९७६, झालेले मतदान १७४५,टक्केवारी -८८.३१,तिळवणी एकूण मतदार-८१५,झालेले मतदान- ७५५ , टक्केवारी-९२.६४,अंजनापूर-एकूण मतदार- १३०७,झालेले मतदान-११६७,टक्केवारी-८९.२९ घारी-एकूण मतदार -१२११,झालेले मतदान-१०४१ टक्केवारी – ८५. ९६ ,मनेगाव-एकूण मतदार-७५६,झालेले मतदान-६७६,टक्केवारी-८९. ४२,मळेगाव थडी-एकूण मतदार-२१८०,झालेले मतदान-१९०९,टक्केवारी-८७.५७ सांगवी भुसार-एकूण मतदार-२३५३,झालेले मतदान-१३१०,टक्केवारी-५५.६७,वेळापूर-एकूण मतदार-२४९६,झालेले मतदान-२०३९,टक्केवारी-८१.६९. जेऊरपाटोदा-एकूण मतदार-२१०५,झालेले मतदान-१६२३,टक्केवारी-७७.१०,काकडी-मल्हारवाडी-एकूण मतदार-२६८८,झालेले मतदान-२३८२,टक्केवारी -८८.६२,नाटेगांव -एकूण मतदार-१७३३-झालेले मतदान-१५३३,टक्केवारी-८८. ४६,कासली-एकूण मतदार-१३१४,झालेले मतदान-११४५,टक्केवारी-८७.१४, ओगदी-एकूण मतदार-७३४,झालेले मतदान-६६४,टक्केवारी-९०.४६,अंचलगाव-एकूण मतदार-८६१,झालेले मतदान- ७१८,टक्केवारी- ८३.३९,कोळगाव थडी- -एकूण मतदार-१६१४,झालेले मतदान-१३९४,टक्केवारी-८३.३७,मायगाव देवी-एकूण मतदार-१४९५,झालेले मतदान-१३३७,टक्केवारी -८९. ४३,हिंगणी- -एकूण मतदार- ७१९,झालेले मतदान-६५७,टक्केवारी-९१.३८,रवंदे-एकूण मतदार-३७४३,झालेले मतदान-३०७५,टक्केवारी-८२. १५,संवत्सर-एकूण मतदार – ८८४७ -झालेले मतदान-६६२३,टक्केवारी-७४.८६,देर्डे चांदवड-एकूण मतदार -१३९९,झालेले मतदान-११९९,टक्केवारी-८५.७०,मढी खु.-एकूण मतदार -१७१९ झालेले मतदान -१४६४,टक्केवारी-८५.१७,मढी बु.-एकूण मतदार-२२९४,झालेले मतदान-१९१४,टक्केवारी-८३.४४,धोंडेवाडी-एकूण मतदार- ७८१,झालेले मतदान-६८८,टक्केवारी-८८.०९,सोनारी-एकूण मतदार-९४८,झालेले मतदान-८१७,टक्केवारी-८६.१८,आपेगाव-एकूण मतदार-१३७१ झालेले मतदान -१२७०,टक्केवारी-९२.६३,येसगाव,एकूण मतदार-३४२८,झालेले मतदान-२७६२,टक्केवारी-७९.७०,टाकळी-एकूण मतदार-३४९३,झालेले मतदान -२७५२,टक्केवारी-७८.७९,कोकमठाण-एकूण मतदार-६५८७,झालेले मतदान-५४९७,टक्केवारी-८३.४५,जेऊर कुंभारी-एकूण मतदार-२९०५,झालेले मतदान-२३७४,टक्केवारी-८१.७२ प्रमाणे मतदान झाले आहे.निवडणूक मतदान प्रक्रिया सुलभतेने संपन्न करण्यासाठी ६०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

निवडणुक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला आहे.राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,दौलतराव जाधव,प्रविण लोखंडे,निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत गोसावी,माधवी गोरे मनिषा कुलकर्णी,अरुण रणनवरे यांचे सह निवडणूक निर्णय अधिकारी,क्षेत्रीय अधिकारी निवडणूक प्रक्रिया सुलभतेने होणे कामी विशेष लक्ष ठेवून होते.यांचे सह विविध खातेनिहाय अधिकारी,शिक्षक,कर्मचारी परिश्रम घेतले आहे.प्रशासनाचे वतीने कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक करिता प्रत्येक मतमोजणी केंद्रावर वैद्यकीय पथक,आशासेविका यांचे मार्फत प्राथमिक तपासणी करण्यात आली होती.मतमोजणी सोमवार दि.१८ जानेवारी रोजी सकाळी ९:०० वाजता तहसिल कार्यालय कोपरगावचे आवारात होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close