कोपरगाव तालुका
ठेकेदार तुमचे,शिफारशी तुमच्या आरोप मात्र आमच्यावर-नगराध्यक्ष वहाडणे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेत वर्षानुवर्षे ठेकेदार भाजप कोल्हे गटाने पोसले आहे.व त्यांच्यात हिस्सेदारी त्यांचीच आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे व त्यांना कामे मिळून देण्यासाठी शिफारशी त्यांच्या नगरसेवकांच्या असताना आरोप मात्र आमच्यावर कसे ? असा प्रतिसवाल कोपरगाव नगरपरषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत करुन कोल्हे गटाचे दात त्यांच्याच घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
“स्थायी समितीत बैठक सुरु असताना या नगरसेवक विक्रम वीरांना ते काम करतात की नाही हे पाहण्यासाठी काही हेर सोडलेले असतात व ते खबरे बैठक असलेल्या सभागृहाच्या बाहेर दारालगत उभे राहून आपले भ्रमणध्वनी सुरु ठेऊन या नगरसेवकांच्या लीला थेट आपल्या युवा नेत्यांना ऐकवित असल्याचा खळबळ जनक आरोप करून या नगरसेवकांना आपली इच्छा असो नाही तर नसो आपला घसा कोरडा पडेपर्यंत ओरडावे लागते”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी आगामी नगरपरिषद निवडणूक डोळयांसमोर ठेऊन आपला व्हेटो वापरून शहर विकासाची सोळा कामे फेटाळून लावल्याने वादाची ठिणगी पडली आहे.त्यावरून वातावरण शहरात ढवळून निघाले आहे.त्यावर दुसऱ्याच दिवशी या संधी साधून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर एक दिवशीय लक्षणीय उपोषण करून कोल्हे गटाला धारेवर धरण्याचा प्रयत्न करून शहरातील घराघरात जाऊन याबाबत जनजागृती सुरु केल्याने याबाबत वादळ उठले आहे.मात्र या लाक्षणिक उपोषणानंतर पुन्हा एकदा कोल्हे गटाने एक (निवडक) पत्रकारांची एक पत्रकार परिषद घेऊन आपली सफाई देताना नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्यावर दुगुण्या झाडल्या आहेत.व त्यात नगराध्यक्ष हेच कमिशन घेत असून त्यांच्याच मुळे शहरात कामे झाली नसल्याचा आरोप केला आहे.या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज आपल्या दालनात एक पत्रकार परिषद घेऊन कोल्हे गटाच्या घशात त्यांचेच दात घालण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव शहरात आपण निवडून आल्या-आल्या सत्ताधाऱ्यांनी आपला हितेशी मुख्याधिकारी नेमून शहरातील विकासकामांचा खेळ करून सहा कोटींचा निधी परत घालवला तेंव्हा यांची शहर विकासाची कळकळ कुठे गहाण ठेवली होती असा वहाडणे छाप तिखट सवाल करून स्थायी समितीत ज्या निविदा मंजुरीसाठी ठेवल्या होत्या त्यात सर्वच प्रभागातील कामांचा समावेश होता.हे सोळा कामांच्या यादीवर एक लक्ष वेध टाकला तरी हि बाब स्पष्ट होण्यास पुरेशी आहे.त्यावेळी त्यांनी नगरपरिषदेच्या ठेकेदारांची यादीच वाचुन दाखवली व सप्रमाण सिद्ध करून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.त्यावेळी उपस्थित पत्रकारांना अवाक होण्याची वेळ आली आहे.त्यात कोल्हे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदाराचा समावेश होता.व कोल्हे गटाच्या अंतर्गत वर्तुळातील कार्यकर्त्यांचा समावेश होता हे विशेष ! व या यादीत काळे गटाचे एखाद-दुसरा ठेकेदार वगळता नव्वद टक्के ठेकेदार हे यांचेच बगलबच्चे असल्याचे सांगितले आहे.यांचे नगरसेवक रस्त्यालगतच्या जागेवर अतिक्रमण करण्यास सांगतात त्या दुर्बल घटकांकडून हप्ते वसूल करतात असा गंभीर आरोप केला आहे.पेव्हर ब्लॉक बाबतच्या कामाबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी ज्या नगरसेवकांनी या कामाची मागणी केली त्यात सर्वाधिक नगरसेवक कोल्हेच्या दुर्दैवाने त्यांचेच आहे.मग त्यांनी त्यांना याबाबत विचारणा केली असती तर ते अधिक संयुक्तिक झाले असते.त्यांच्या नगरसेवकांनी आजही पत्र दिले तर आपण वेगळा विचार करू असा टोला लगावला असून कोल्हेच्या कोर्टात चेंडू भिरकावला आहे.व अनेक ठेकेदारांनी कसा कोल्हे गटात प्रवेश केला केंव्हा केला याचे नमुने पेश केले आहे.व त्यांच्याच गळ्यात त्यांच्या तंगड्या अडकवल्या आहेत.प्रभाग क्रमांक आठ मधील दोन्ही ठेकेदार हे कोल्हे गटाचेच होते.व काम घेण्याची स्पर्धा त्यांच्यात होती हि बाब प्रकर्षाने लक्षात आणून दिली आहे.२८ पैकी १६ कामच्याच निविदा कशा ? या प्रश्नाला त्यांनी काही निविदांच्या त्रुटी असल्याने त्या पूर्ण करण्याचे काम सुरु आहे.त्यात या विकास कामांना खो घालण्यासाठी यांच्या काही ठेकेदारांनी नेत्यांच्या आदेशाने उशिरा निविदा अर्धवट माहितीत भरल्या आहेत.त्यात कमी दरांच्या निविदा असतील तर त्या रकमेचा डिमांड ड्रॉफ्ट आवश्यक असतो मात्र तोच नसल्याने हि पूर्तता कायदेशीर रित्या ठरत नसल्याचे निदर्शनात आणले आहे.
दरम्यान या निविदांना विरोध का होतो आहे ? या प्रश्नावर त्यांनी,”स्थायी समितीत बैठक सुरु असताना या नगरसेवक विक्रम वीरांना ते काम करतात की नाही हे पाहण्यासाठी काही हेर सोडलेले असतात व ते खबरे बैठक असलेल्या सभागृहाच्या बाहेर दारालगत उभे राहून आपले भ्रमणध्वनी सुरु ठेऊन या नगरसेवकांच्या लीला थेट आपल्या युवा नेत्यांना ऐकवित असल्याचा खळबळ जनक आरोपही वहाडणे यांनी केला आहे.व त्यामुळे या नगरसेवकांना आपली इच्छा असो नाही तर नसो आपला घसा कोरडा पडेपर्यंत ओरडावे लागत असल्याचे निदर्शनास आणले आहे.त्यावेळी उपस्थित पत्रकारांना आपले हसू आवरले नाही.शेवटी तर त्यांनी सांगितले की,”यातील बहुतांशी नगरसेवक हे खाजगीत आपले मित्र असून हि मंडळी आम्हाला इच्छा नसूनही या गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागत असल्याची प्रांजळ कबुली देतात”असे हि सांगून पत्रकार परिषदेतील करमणूक वाढवली आहे.
आमच्या प्रतिनिधीने पोलीस ठाणे ते महावितरणचे पॉवर हाऊस दरम्यानच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण हे निकृष्ट झाल्याबाबत लक्ष वेधले असता त्यांनी शहरातील जी कामे निकृष्ट झाली आहेत त्या ठेकेदारांना नोटिसा काढल्या असून त्यांचे समाधानकारक उत्तर दिले नाही तर त्यांची पालिकेकडील अनामत जप्त करून घेण्यात येईल असे बजावले आहे.व आगामी काळातील हि कामे आम्ही कुठल्याही स्थितीत करणार असल्याचे निक्षून सांगितलें आहे.व सत्ताधारी गटाच्या नेत्यांना इशारा देताना सांगितले आहे की.”आपली विधानसभा,साईसंस्थान,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती आदी ठिकाणी जनतेने या (वाईट) सवयीपायी हकालपट्टी केलेली आहे.आता तरी त्या वागण्यात सुधारणा करून घ्या अन्यथा आगामी काळ अजून खडतर येईल असा इशारा शेवटी दिला आहे.