कोपरगाव तालुका
..या गावात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
चांदेकसारे येथे आ.आशुतोष काळे मित्रमंडळ व जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुलच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते पार पडले आहे.
कोरोना साथीच्या काळात नागरिक घराबाहेर न पडल्यामुळे व सार्वजनिक कार्यक्रम बंद झाल्यामुळे रक्ताची टंचाई भासू लागली आहे त्यामुळे नागरिकांनी व विशेषतः तरुणांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावेळी रक्तदानासारखा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल चैताली काळे यांनी आ.आशुतोष काळे मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांचे तसेच जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुलच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण,शंकरराव चव्हाण,जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुलचे भास्कर होन,सुनील होन,किरण होन,अशोक होन,आर.आर.होन,भीमराव होन, दुर्गानाना होन,अर्जुन होन,बाबासाहेब होन,शरद होन, राजेंद्र होन आदीं मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.