धार्मिक
लोहगावात भागवत कथेचे आयोजन
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे लोहगाव येथील भजनी मंडळ तरुण मित्र मंडळ युवक कार्यकर्ते व सामाजिक संघटना तसेच रामायणाचार्य संदीप महाराज चित्रे यांच्या वाणीतून १० जानेवारी ते १७ जानेवारी पर्यंत संगीतमय श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
भागवत कथेचे दैनंदिन कार्यक्रम सकाळी पाच ते सात काकडा,आठ ते बारा साई पारायण,सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ,सायंकाळी सात ते दहा श्रीमद् भागवत कथा तद्नंतर महाप्रसाद आयोजन करण्यात आलेले आहे.कथा प्रवर्तक रामायणाचार्य ह.भ.प.प्राध्यापक संदीप महाराज चेचरे यांना तबला वादक बाबासाहेब वाघ सर,मृदुंग आचार्य ह.भ.प.राहुल महाराज चेचरे,गायनाचार्य ह.भ.प.शिवनाथ महाराज पवार,ह.भ.प.विष्णुबुवा बुलबुल,ह.भ.प.बनसोडे सर,ह.भ.प.जगदीश महाराज शेळके,माऊली महाराज झुरळे,ह.भ.प.खळदकर माऊली रामपूर यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.तरी लोहगाव प्रवरानगर परिसरातील नागरिकांनी सदर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन लोहगाव भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.