जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य रवींद्र बोरावके पुन्हा जुन्या संवगड्यात सामील ?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र बोरावके यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नरेंद्र मोदी मंचच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास पाच वर्षात प्रथमच आवर्जून हजेरी लावल्याने आ. कोल्हे गटात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,गत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आ. स्नेहलता कोल्हे व त्यांच्या समर्थकांनी आगामी भाजपचे वारे लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे बारा वाजवत भाजपाला जय श्रीराम म्हणत जवळ केले होते.त्यावेळची ती सत्तेत जाण्यासाठी दहा वर्षांनी मिळालेली संधी म्हणून त्यांना त्याची नितांत गरज होती मात्र हे करताना आ. कोल्हे याना भाजपात घेण्यासाठी ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोरावके यांनी अहम भूमिका वठवली होती.त्यामुळे आ. कोल्हे याना आपला भाजप प्रवेश करणे सुकर झाले होते.आपल्या या मदतीचे ऋण कोल्हे कुटुंबीय आवर्जून ठेवतील व अपलेही त्यांच्या मागे-पुढे भले होईल हि त्या मागे रास्त अपेक्षा होती.व ती स्वाभाविकही म्हटली पाहिजे.मात्र विधानसभा निवडणुकीनंतर लवकरच त्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून आले.कारण देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साई संस्थानच्या नेमणुकीत खरे तर रवींद्र बोरावके यांना निसर्ग न्यायाने आ. कोल्हे यांनी संधी देणे अपेक्षित होते.मात्र झाले उलटेच या निवडीत आ. कोल्हे यांनी आपले पती व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे नाव पुढे करत बोरावके व विजय वहाडणे यांचे विश्वस्त पदासाठी बनावट वरिष्ठ पातळीवर भांडण दाखवून स्वतःचीच पोळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुन्हा एकदा भाजून घेतली.तेव्हां वेळ निघून गेलेली होती.व बोरावके यांच्या हातात काहीच राहिले नव्हते. तरीही त्यांनी पाच वर्षे परिपक्व राजकीय नेत्याची सहनशीलता,संयम दाखवून वेळेची प्रतीक्षा केली.आता मागील हिसाब किताब करण्याची वेळ आली असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी काही दिवासाचाच कालावधी राहिला आहे.अशा परिस्थितीत वेळेचे योग्य भान राखत,व समयसूचकता दाखवत कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन पावले मागे घेत नुकत्याच संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिनासाठी नरेंद्र मोदी मंचच्या ध्वजारोहनास थेट आपले जुने सहकारी व जेष्ठ नेते रवींद्र बोरावके यांनाच पाचारण केले.विशेष म्हणजे बोरावके यांनीही सदर कार्यक्रमास लागलीच हो म्हटले व कृतीची जोड देऊन ध्वजारोहण कार्यक्रमास आवर्जून हजेरीही लावल्याने आ. कोल्हे समर्थकांच्या भुवया न उंचावल्या तर नवल! त्याची दखल कोपरगावातील कोल्हे भाजपाला घ्यावी लागली असून त्यांनी बोरावके यांना कोल्हे प्रवाहात आणण्यासाठी आज सकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी पुतळ्या समोर आयोजित कार्यक्रमासाठी आवर्जून बोलावणे धाडले असून त्यांची हजेरी लागेल अशी व्यवस्था केली आहे. या उलाढालीने कोल्हे गटाला धडकी भरली असून नमनालाच घडाभर तेल ओतण्याची वेळ न आली म्हणजे कमावली! या आधीच विजय वहाडणे यांनी तालुकाभर दौरा करून व मोफत वैद्यकीय शिबिरे घेऊन संघटन मोठ्या प्रमाणात वाढवले आहे त्यांना तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कोल्हे गटास आताच दिवसा तारे चमकण्यास सुरुवात झाली आहे.

भाजपने केलेल्या उमेदवाराच्या तिन्ही सर्वेत कोपरगावची जागा गेल्यात जमा धरली आहे.व भाजपने लोकसभा निवडणुकीत अशा जागांबाबत अजिबात जोखीम उचललेली नाही अशा पडीच्या जागेवर थेट नवीन उमेदवार देऊन जवळपास २५७ जागेवर नवीन खासदार निवडून आलेले आहे.हे येथे विसरता येत नाही.याची जाणीव प्रस्थापितांना नाही असे मुळीच नाही म्हणूनच त्यांनी मध्यन्तरी आपल्या कार्यक्रमातील फ्लेक्सवरून भाजपचे कमळ गायब केले होते.तर तिकडे भाजपने राष्ट्रवादीच्या गट निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवाराला लोणी मार्गे गळाला लावले असल्याने भाजपची उमेदवारीची चिंता आधीच मिटलेली आहे.याची जाणीव सत्ताधाऱ्यांना असल्यानेच त्यांनी नांदेड मधील राज्याच्या काँग्रेस मधील माजी मुख्यमंत्र्याशी संधान बांधून उमेदवारी मिळविण्यासाठी संपर्क साधला असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.त्यामुळे आगामी काळात कोपरगाव तालुक्यात राजकीय वर्तुळात माय लेकराला धरण्याची सुतराम शक्यता दिसत नसल्याने विविध पक्षाच्या जोडे व सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यानी या नेत्यांवर किती निष्ठा ठेवायची याचा धरबंध ठेवणे हि काळाची गरज बनली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close