जाहिरात-9423439946
आदिवासी विकास विभाग

आदिवासी बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य शासनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी विविध लाभाच्या योजना राबविण्यात येत आहे.आदिवासी बांधवांना आर्थिक स्थैर्य मिळावे व त्यांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा या उद्देशातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.

ठक्करबाप्पा योजना अनु.जमातीच्या वास्तव्य असलेल्या गावामधे मुलभुत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेली आहे यामधे आदिवासी वस्तीमधे अंतर्गत सिमेंट रस्ते,सार्वजनिक शौच्यालय,मंगल कार्यालय, समाज मंदिर, पिण्याचे पाणी पुरवठा,आरोग्य केंद्र,व्यायामशाळा,शालेय इमारत खोली बांधकामे,स्मशान भूमी शेड, पथदिवे,सोलर सिस्टीम इत्यादी सार्वजनिक सुविधासह विविध वैयकीत योजना आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येतात.

अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ८५% अनुदानावर विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.या योजनांमध्ये हलर मशिन पुरवठा करणे,अनुदानावर कुकुटपालन शेड व इतर साहित्य पुरवठा करणे,अनुसूचित जमातीच्या महिला बचत गट,पुरुष गट,शेतकरी गटास मिनी राईस मिल युनिट सुरु करणेबाबत सामुहिक प्रकल्पास मंजुरी देणे,फिटर ट्रेड आय.टी.आय.प्रशिक्षण पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांना टुलकिट पुरवठा करणे,पिठाची गिरणी,घरघंटी खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.अनुसचित जमातीच्या महिला बचत गटांना मसाले निर्मिती व्यवसाय करणेसाठी कांडप यंत्र युनिट खरेदी साठी अर्थसहाय्य देणे,पर्यटन क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांना टेंट (तंबू) पुरवठा करणे,अनुसुचित जमातीच्या बचत गटांना कॅटल फिड तयार करणे मशिनचा पुरवठा करणे,ब्युटी पार्लर प्रशिक्षण पुर्ण केलेल्या अनुसूचित जमातीच्या महिलांना ब्युटी पार्लर व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्य साहित्याचा पुरवठा करणे,ब्रेडिंग पॅकेजिंग मशिनचा पुरवठा करणे,अनुसूचित जमातीच्या बचत गटांना लाकडी तेल घाणा मशिनचा पुरवठा करणे,बांबूकाम करण्यासाठी टुलकिट पुरवठा करणे,अनुसुचित जमातीच्या शेतक-यांना शेतमालाचे पावसापासून संरक्षण तसेच शेतकामासाठी ८५ % अनुदानावर ताडपत्री पुरवठा करणे.

याशिवाय पर्यटन क्षेत्रातील पर्यटनस्थळी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणे अथवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा किट प्रदान करणे,हॉटेल व्यवसायासाठी स्टॉल व इतर साहित्य पुरवठा करणे,बचत गटांचे सक्षमीकरण करण्याकामी बचतगटांना अर्थसहाय्य देणे.प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भजनी मंडळास स्वयंपाकाची भांडी खरेदी करण्यासाठी मदत करणे.पर्यटन क्षेत्रातील लाभार्थ्यांना गाईड प्रशिक्षण देणे,अनुसुचित जमातीच्या लोकनाट्य तमाशा मंडळास व पारंपारिक लोकनृत्य कला पथकास अर्थसहाय्य देणे.आदिवासीवरील आपत्कालीन किंवा अत्याचार ग्रस्त प्रकरणी अपवादात्मक विशेष परिस्थितीत तातडीने अर्थसहाय्य देणे तसेच डांगी व संकरीत जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यास जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यास अर्थसहाय्य करणे.
अशा विविध योजनांचा समावेश असून आदिवासी गरजू लाभार्थ्यांनी शासनाच्या या अनुदान योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी आ.काळे यांनी शेवटी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close