निवडणूक
श्रीरामपुरात दुसऱ्या दिवशी चार अर्ज दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
श्रीरामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतिच्या १५ जानेवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवार दि २३ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी बेलापूर बुद्रुक साठी सर्वसाधारण गटातून प्रभाग एक मधून एकमेव अर्ज दाखल झाला होता तर दुसऱ्या दिवशी लाडगाव येथून तीन तर एकलहरे येथून एक अर्ज दाखल झाला आहे.
राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून २३ डिसेंबर सुरुवात झाली आहे. राज्यातील १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.
अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी बेलापुरातुन सर्वसाधारण गटातून प्रभाग एक मधून किरण अर्जुन गागरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.तर दुसऱ्या दिवशी लाडगाव ग्रामपंचायतीसाठी प्रभाग दोन मधून संदीप चोरगे व संगीता भांड तर एकलहरे येथे प्रभाग दोन मधून किशोर फटांगरे यांनी अर्ज दाखल केले आहेत.दोन दिवसात एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत.