कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात दुचाकी चोरीचे सत्र
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील लौकी शिवारातून साधारण वीस हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना (क्रं.एम.एच.१७ सी.ए.२१२३) हि घरासमोर उभी करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्याने दि.२० डिसेंम्बर रोजी दुपारी चार ते रात्री ०८ वाजे दरम्यान अज्ञात चोरट्याने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी गणेश सर्जेराव डोंगरे (वय-३९) यांनी दाखल केली आहे.
लौकी शिवारातील रहिवासी गणेश डोंगरे हे असून ते शेतकरी आहेत.त्यांनी आपली वरील क्रमांकाची दुचाकी हि आपल्या घरासमोर उभी करून ठेवलेली असताना दि.२० डिसेंम्बरच्या दुपारी चार वाजेच्या दरम्यान ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कधीतरी पाळत ठेऊन घराबाहेर कोणी नाही हि संधी साधत फिर्यादीच्या समंती शिवाय आपल्या फायद्यासाठी पळवून नेली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हे लौकी शिवारातील रहिवासी असून ते शेतकरी आहेत.त्यांनी आपली वरील क्रमांकाची दुचाकी हि आपल्या घरासमोर उभी करून ठेवलेली असताना दि.२० डिसेंम्बरच्या दुपारी चार वाजेच्या दरम्यान ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कधीतरी पाळत ठेऊन घराबाहेर कोणी नाही हि संधी साधत फिर्यादीच्या
समंती शिवाय आपल्या फायद्यासाठी पळवून नेली आहे.या प्रकरणी फिर्यादी गणेश डोंगरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५५९/२०२० भा.द.वि कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.दरम्यान नुकतीच डॉ.राजेश माळी यांच्या रुग्णालयाच्या पार्किंग मधून एक्स रे ऑपरेटर देवकर यांची एक दुचाकी नुकतीच चोरी गेली असताना हि लागोपाठ तीसरी घटना घडली आहे.त्यामुळे दुचाकीस्वारात भीतीचे वातावरण पसरले आहे.