कोपरगाव तालुका
पोष्टातील रक्कम हडप,पोष्टमास्तरवर गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील रहिवाशी असलेल्या तीन महिलांच्या नावावरील पोष्टात टाकलेली ४० हजार २०० रुपयांची रक्कम परस्पर बनावट सह्या करून हडप केल्याप्रकरणी आज कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात बोलकी येथील आरोपी पोष्ट मास्तर रवींद्र बाळासाहेब जाधव याचे विरुद्ध डाक निरीक्षक विनायक सोन्याबापू शिंदे (वय-३८) यांनी गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
धारणगाव येथील माहिलांनी आपली अल्पबचत करण्यासाठी पोष्टात आपली नियमित ठेव ठेवली होती.आरोपी पोष्ट मास्तर रवींद्र जाधव याची या ठेवींवर वाकडी नजर होती.त्याने याबाबत बनावट नोंदी करून खातेदारांचे नावावरून परस्पर पैसे काढून ते सरकारी खात्यात जमा न करता ते आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,धारणगाव येथील महिलां लताबाई विष्णू चौधरी,मीराबाई निवृत्ती कदम,व विठाबाई सीताराम आभाळे तिन्ही रा. धारणगाव यांनी आपली अल्पबचत करण्यासाठी पोष्टात आपली नियमित ठेव ठेवली होती.आरोपी पोष्ट मास्तर रवींद्र जाधव याची या ठेवींवर वाकडी नजर होती.त्याने याबाबत बनावट नोंदी करून खातेदारांचे नावावरून परस्पर पैसे काढून ते सरकारी खात्यात जमा न करता ते आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरले आहे.हि बाब पोष्ट खात्यातील निरीक्षक व फिर्यादी विनायक शिंदे यांच्या लक्षात आली.याबाबत या महिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.त्यामुळे आज याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आज आरोपी रवींद्र जाधव याचे विरुद्ध गुन्हा क्रं,५५८/२०२० भा.द.वि.कलम ४२०,४०९,४६८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.या घटनेने पोष्टात ठेव ठेवणाऱ्या नागरिकांच्या विश्वासाला तडा गेला आहे.याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.